ब्राह्मणाचे स्वप्न
|
असाच एख दिवस झोपला असताना मनोराज्य करण्यास ब्राह्मण सुरुवात करतो, ''थोड्याच दिवसात हा घडा तांदळाने भरेल..... अशा तर्हेने माझ्याकडे भरपूर धान्य जमा होईल. मग दुष्काळ पडला की ते जास्त भावाने विकून पैसा कमवीन. आलेल्या पैशातून शेळ्या घेईन. नंतर त्या शेळ्यांचा सहा महिन्यांनी कळप झाला की तो कळप विकून गाई म्हशी विकत घेईन. नंतर त्या विकून घोडे विकत घेईन. त्यांच्यासाठी मोठी पागा झाली की ती विकून मी लक्षाधीश होईन. मग एखाद्या श्रीमंताची सुंदर मुलगी असेल तिच्याशी माझे लग्न होईल. आम्हाला छानसा मुलगा होईल. तो मुलगा खेळता खेळता घोड्याजवळ जाईल. त्यावेळी मी बायकोला ओरडेन, पण ती कामात असल्याने मुलाला पटकन उचलू शकणार नाही. त्यामुळे मी तिला रागाने लाथ मारीन.'' असे स्वप्नात बडबडताना ब्राह्मण खरंच लाथ मारतो ती वर टांगलेल्या घड्यावर लागते, त्यामुळे घडा वरून खाली पडतो आणि धान्य विखरते.
तात्पर्य : मनोराज्ये करण्यापेक्षा कृती करणे आवश्यक असते.

