एकजूट साधती कार्यभाग
|
चिमणी या प्रसंगामुळे जोरजोरात रडू लागली. तिचा एक मित्र सुतार पक्षी जवळच राहत होता. चिमणीच्या रडण्याने तो धावत आला.
सुतार पक्षी तिची समजूत काढू लागला, ''गेलेली अंडी परत येणार का? तेव्हा डोळे पुस आणि पुन्हा उद्योगाला लाग!'' तेव्हा चिमणी उत्तरते, ''हे सगळं खरं! पण या मदोन्मत्त हत्तीला ठार करण्याचा उपाय सांग. कारण याने माझी अंडी फोडलीत.''
सुतार विचार करून सांगतो, ''माझी वीणाखा नावाची एक माशी मैत्रिण आहे. तिची मदत घेऊ आपण!'' नंतर वीणाखा माशीला सुतार पक्षाकडून हकीगत कळल्यावर ती सांगते, ''माझा मेघनाद नावाचा एक बेडूक मित्र आहे. त्याचा आपल्याला खूप उपयोग होईल.''
|
मेघनाद बेडकाची कल्पना सगळ्यांना आवडते त्याचप्रमाणे हत्तीला खड्ड्यात पाडले जाते. थोड्या दिवसांनी हत्ती मरण पावतो.
तात्पर्य : एकजूटीने कार्य केल्यास शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्यावर मात करता येते.

