'सॅम' आणि 'शुभा' यांची भेट तशी रेल्वे प्रवासात झाली होती. प्रवास तसा फार लांबच नव्हता. पण, दोघेही बोलके असल्याने त्यांच्यात 'गट्टी' कधी जमली, हे कळलेच नाही. दोघेही उच्च शिक्षित. आणि विशेष म्हणजे एकाच कंपनीत नोकरीला. दोघांची वाट सारखीच असल्याने ते जीवनसाथी होतील, असा तर 'अप अॅण्ड डाऊन'करांनी भ्रम करून टाकला होता. परंतु काय? दीड वर्षातच त्यांच्यातील मैत्री तुटली. सॅम हा 'मैत्री'ला 'प्रेम' समजून शुभाची जीवाभावाची 'मैत्री'ही गमवून बसला....अशी, 'सॅम' आणि 'शुभा'ची तुटलेल्या 'मैत्रीची गोष्ट!
सॅम अन् शुभा एकाच कंपनीत कामाला होते. विशेष म्हणजे एकाच गावाहून येत असल्याने सोबतच यायचे व जायचे. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणं, आलेल्या अडचणी सोडवणं, एवढंच नव्हे तर एकमेंकांना अडचणीच्या काळात आर्थिक सहकार्य करणं, इतकी त्यांच्याच गट्टी जमली होती. एखाद्या दिवशी सॅमला कामात वेळ झाला तर शुभा ही त्याच्यासाठी थांबायची. शुभाच्या बाबतीतही सॅमची तशीच भूमिका असायची. घरी यायला जरी वेळ होत असला तरी 'सॅम'सोबत आहे ना, मग नो टेन्शन! इतका शुभाच्या वडिलांचा सॅमवर विश्वास होता. शुभाची आईला जाऊन दोन वर्षे झाली होते. तिला कॅन्सर होता. घरातील कामही शुभालाच करावी लागत असल्याने तिची मोठी धावपळ होत होती.
सॅम व शुभा यांच्या मैत्रीला नाबाद दीड वर्ष झाले होते. म्हणजेत त्याच्यात कुठल्याच प्रकार मतभेद झाले नव्हते. त्यामुळे त्यांच्या मैत्री ही ऑफिसाल्या सगळ्या सहकार्यांना माहित होती. 'त्या' दोघांची जोडी 'अप अॅण्ड डाऊन'करांनाही चांगलीच ओळखीची झाली होती. परंतु, मैत्रीत व प्रेमात 'Third Preson' किती घातक असतो, याची प्रचिती आली.
'सॅम'ची राजा नामक युवकाशी ओळख झाली. सॅमने त्याची ओळख शुभाशीही करून दिली. राजाही एका कंपनीत मार्केटींग एक्झिकेटीव्ह होता. शुभा आणि सॅम यांच्या मैत्रीला 'राजा' नावाचा कधी न सुटणारा 'ग्रहणस्पर्श' झाला, मात्र त्याची त्या दोघांना कल्पनाच आली नाही.
शुभा व सॅम यांच्यातील मैत्रीच्या गोष्टी राजाशी शेयर केल्या जाऊ लागल्या. शुभा व सॅमविषयी राजा निरनिराळे तर्क-वितर्क लढवू लागला. सॅम व शुभाच्या गैरहगेरीत राजा 'अप अॅण्ड डाऊन'करांमध्ये त्यांच्या मैत्रीची खिल्ली उडवू लागला होता. तरीही सॅम व शुभाला राजाची ओळख कळली नाही. 'अप अॅण्ड डाऊन'मधील टवाळकी मुलं सॅम- शुभाला कधी 'लैला-मजनू' तर कधी 'हिर-रांझा' म्हणून दबक्या आवाजात चिडवायची. परंतू शुभा त्याकडे दूर्लक्ष करायची. मात्र सॅमच्या मनात शुभाविषयीच्या एकतर्फी प्रेमाचे 'बी' पेरण्यासाठी राजा व टवाळकी मुलं खतपाणी घालत होती. शुभाच्या गैरहजेरीत सॅमही राजा व 'त्या' इतर मुलांमध्ये चांगलाच मिसळायला लागला होता.
काही दिवसातच सॅमच्या वागण्या- बोलण्यात कमालीचा बदल झाला होता. नेहमीपेक्षा शुभाची तो जरा जास्त काळजी घेत होता. सॅमच्या मनात कोणते विचार सुरू आहेत, याचा पत्ता शुभा नव्हता. सॅमच्या मनात शुभाविषयीच्या एकतर्फी प्रेमाची घोडे चहूबाजूंनी दौडत होती. शुभाला 'प्रपोज' करण्यासंदर्भात राजा सॅमच्या मनान नेहमी भरतवत असे आणि सॅमही त्याच्या गोष्टींनी चांगलाच भारावला होता.
एके दिवशी शुभा ऑफिसात जाण्यासाठी वेळेत रेल्वेस्टेशनवर पोहचली. परंतु नेहमी गाडी सुटण्याच्या वेळवर येणार्या सॅमला पाहून तिला आश्चर्य वाटले होते. सॅम व शुभा नेहमीप्रमाणे जागा पाहून गाडीत बसले. सॅम गाडीत बसल्यापासून गप्पच होता. शुभाची नेहमीप्रमाणे वटवट सुरू झाली होती. गाडी सुरू झाली तरी सॅम सुन्नच होता. सॅमननं शुभाला त्या दिवशी ऑफ घ्यायचं सांगितलं. ती ही बिचारी मित्राच्या सांगण्यावरून तिने ऑफ घेतला. सॅम, शुभाला एका रेस्टारंटमध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी सॅमने शुभाला 'प्रपोज' केलं. सुरवातीला शुभाला ती गम्मत वाटली. परंतु ते सत्य असल्याची सॅमने स्पष्टोक्ती केली अन् एका क्षणात दीड वर्षांपासून त्यांच्यात विश्वासाच्या आधारावर वाढत असणारी 'मैत्रीची वेल' गळून पडली.
सतत बडबडणारी शुभा एकदम सुन्न झाली. तिला काय करावे, हे सूचत नव्हते. सॅमला कोणतेच उत्तर न देता शुभा सरळ घरी निघून गेली. मोबाईलवर तिच्याशी संपर्क साधण्याचा सॅमने खुप प्रयत्न केला परंतु तीने, फोन रिसिव्ह केला नाही.
दुसर्या दिवशी शुभा ऑफिसात आली ती रिझाईन लेटर घेऊनच. सॅमशी एक शब्द ही न बोलता ती सरळ बॉसच्या कॅबीनमध्ये गेली. तरी सॅमला कधीच भेटली नाही.
सॅमच्या मनात शुभाविषयीची प्रेम भावना जागृत करण्यासाठी राजाचा सिंहाचा वाटा तर होताच परंतु सॅम किती बावळट की, तो शुभाच्या निस्वार्थ मैत्रीला प्रेम समजून गल्लत करून बसला व तिची जीवभावाची मैत्री कायमचीच गमवून बसला...