Republic Day, 26 January, Republic Day Parade, Republic Day Festival | राष्ट्रध्वजाचा प्रारंभ कसा झाला?
आपल्या देशाची ओळख म्हणजे त्या देशाचा ध्वज असतो. त्या ध्वजावरील प्रतीक पाहून तो देश ओळखला जातो. जगात सर्वप्रथम म्हणजे १२१९ मध्ये डेन्मार्क आणि १३३९ मध्ये स्विर्त्झलंड या देशांनी ध्वजाची परंपरा सुरू केली. आता जवळजवळ सर्वच देशांनी या परंपरेचे अनुकरण केले आहे. सुरवातीला लाकडाच्या ध्वजावर विविध आकृत्या बनवून त्याचा उपयोग ध्वज म्हणून केला जात असे.
पहिल्यांदा रोमने कापडाच्या ध्वजाची सुरवात केली. अगदी पूर्वी सैनिक ध्वजाचा उपयोग करत होते, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. सैनिकांना एकत्र करण्यासाठी एका ठिकाणी झेंडा गाडून त्यावर कपडा बांधला जात असे. तो हलता कपडा पाहून सैनिक त्याठिकाणी एकत्र जमत असत. ज्यू लोक आपल्याजवळ झेंडे बाळगत असल्याचा उल्लेख बायबलमध्येही केला आहे. मध्यंतरी झेंड्यांचा अधिक उपयोग वाढला. आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय ध्वज तीन रंगात आहे. तो रंग केसरी, पांढरा आणि हिरवा असा असून मधोमध असलेल्या पट्टीवर अशोकचक्राचे प्रतीक आहे.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा