अध्यक्ष महाशय,
आज मी भारतीय रेल्वेच्या वर्ष 2008-09 साठी संशोधित, अनुमानित आणि 2009-10 साठीचा अंदाजित लेखानुदान विवरण सभागृहासमोर सादर करीत आहे.
अध्यक्ष महाशय
शुक्रिया से मैं शुरू करता हूँ अपनी बात आज, साथ लेकर मैं चला हूँ देश, दुनिया और समाज, मैं चुकाता ही रहूँगा देश की मिट्टी का कर्ज, राष्ट्र सेवा रीत मेरी और यही मेरा रिवाज
राष्ट्र सेवेच्या प्रवासात रेल्वेने महत्वाचा टप्पा माझ्या कारकिर्दीत पार पाडला याबद्दल मला अभिमान वाटतो. सर्वसामान्य माणसावर कोणताही बोजा न टाकता रेल्वेला दरवर्षी नव्या शिखरावर पोचविण्यासाठी माझा प्रयत्न राहिला आहे. पाच वर्षाच्या माझ्या काळात रेल्वे प्रथमच 90 हजार कोटींचा नफा कमवण्याच्या दिशेने अग्रेसर झाली आहे. 2001 मध्ये ज्या रेल्वे विभागाकडे आपल्या जर्जर गाड्यांना व त्यांच्या भागांना बदलण्यासाठीही पैसे नव्हते. आज त्याच रेल्वेने आपल्या ऐतिहासिक वित्तीय कायाकल्पाने संपूर्ण जगाला आश्चर्यचकीत केले आहे.
महोदय, नव्वदच्या दशकात साधारणतः तीन टक्के वार्षिक दराने प्रगती करणा-या रेल्वेने गेल्या पाच वर्षात सुमारे आठ टक्क्यांच्या वार्षिक दराने आपल्या फ्रेट लोडिंगमध्ये वाढ करण्यात यश मिळविले आहे. इतकेच नव्हे तर सिमेंट व स्टीलच्या वाहतुकीतही अनेक वर्षांपासून होत असलेल्या घसरणीला थांबवून त्यात अमुलाग्र बदल घडविण्यात यश मिळविले आहे. कारीगरी का ऐसा तरीका बता दिया, घाटे का जो भी दौर था बीता बना दिया, भारत की रेल विश्व में इस तरह की बुलंद, हाथी को चुस्त कर दिया, चीता बना दिया
|