हाथरस पुन्हा एकदा हादरले : 4 वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीन मुलांनी केला बलात्कार

Last Modified शनिवार, 24 ऑक्टोबर 2020 (14:29 IST)
हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र याच दरम्यान आता हाथरस पुन्हा एकदा हादरले आहे. अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार (rape case) झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हाथरसमध्ये अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांचे वय 9 आणि 12 वर्ष असल्याचं सांगण्यात आलं आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिल्यानंतर स्थानिक हाथरस पोलीस ठाण्यात बलात्काराच्या (rape case) घटनेची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेली दोन्ही मुलं एकाच गावातील आहेत. कायद्यातील तरतुदींनुसार गुन्ह्याची नोंद करून घेण्यात आली आहे. पीडित मुलीस वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून, पुढील कारवाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वी 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची भयंकर घटना समोर आली होती उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. अलीगड जिल्ह्यातील इगलास गावात ही धक्कादायक घटना घडली होती.
चिमुकलीवर 15 दिवसांपूर्वी बलात्कार करण्यात आला होता. प्रकृती गंभीर असल्याने मुलीवर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारानंतर मुलीचा मृत्यू झाला. मुलीचा मृतदेह दिल्लीहून राहत्या घरी आणत असताना पीडितेच्या कुटुंबियांनी रस्ता रोखला. तसेच आरोपीला शिक्षा मिळाल्यानंतरच मुलीवर अंत्यसंस्कार केले जातील असं पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी म्हटलं होतं. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईचं निधन झालं आहे. त्यामुळे सहा वर्षांची चिमुकली काही दिवसांसाठी आपल्या मावशीच्या घरी राहायला गेली होती. त्याच वेळी मावस भावाने तिच्यावर बलात्कार केला होता.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

15 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रत्येकाला मिळणार घर

15 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रत्येकाला मिळणार घर
मोदी सरकार पुढील वर्षी 15 ऑगस्ट 2022 पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला घर देण्यासाठी ...

कर्नाटक: ट्रकमध्ये झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण जिल्हा ...

कर्नाटक: ट्रकमध्ये झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण जिल्हा हादरला, आठ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात गुरुवारी रात्री स्फोटक वाहून नेणार्‍या ट्रकचा स्फोट झाला ...

अभिमानास्पद : प्रजासत्ताकदिनी इतिहास रचणाऱ्या भावना कंठ, ...

अभिमानास्पद : प्रजासत्ताकदिनी इतिहास रचणाऱ्या भावना कंठ, परेड मध्ये भाग घेणाऱ्या पहिल्या महिला फायटर पायलट
यंदाचा प्रजासत्ताक दिन खूप खास आणि गर्वाचा असणार आहे. वास्तविक हवाई दलाची पहिली महिला ...

अ‍ॅमेझॉन ग्राहकाने ‘उपले’ (Cow Dung Cake)ला समजले केक, ...

अ‍ॅमेझॉन ग्राहकाने  ‘उपले’ (Cow Dung Cake)ला समजले केक, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे रिव्ह्यू
आपण कधी उपला खाल्ल्या बद्दल विचार केला आहे? ही गोष्ट तुम्हाला विचित्र वाटेल पण सोशल ...

शेतकरी लाँग मार्चमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब ...

शेतकरी लाँग मार्चमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे नेते सहभागी होणार
“केंद्र सरकारने देशातील शेतक-यांवर लादलेल्या काळ्या कृषी कायद्यांविरोधात, शेतकरी संघटना व ...