जवान आणि चिनी सैनिक लडाखमध्ये आमने-सामने

Last Modified सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (13:39 IST)
भारत-चीन लडाखच्या सीमेवरील तणाव शांत होण्याचं नाव घेत नाही. चीनची दादागिरी सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकवेळा केलेल्या चर्चा आणि कराराचं चीनकडून उल्लंघन होत असल्याचं पाहायला पुन्हा एकदा मिळालं. गॅलव्हान खोऱ्यानंतर आता पुन्हा एकदा लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. 29 ऑगस्टला रात्री उशिरा पैंगोग त्सो झील इथे भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य आमने-सामने आल्याची माहिती मिळाली.

चीननं भारतीय सीमांमध्ये पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असून भारतीय सैन्यातील जवानांनी ड्रॅगनचा हा डाव उधळून लावल्याची माहिती मिळाली आहे. गलवान खोऱ्यानंतर चीननं आपलं सैन्य आणि टेन्ट हलवून पैंगोग त्सो झील भागात नेण्यास सुरू केलं होतं. चीनच्या सर्व हालचालींवर भारताची नजर होती. त्यामुळे चीन काहीतरी कुरापती करणार याची चाहूल लागल्यानं ड्रॅगनचा डाव उधळून लावण्यात यश आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) सैन्याने तयार केलेल्या सहमतीच्या शर्तींचं उल्लंघन करत पूर्व लडाखच्या भागामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने चिनी सैन्यांना पांगोंग आणि पांगोंग लेक क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या चीन सैन्याचा डाव उधळून लावला आहे. सध्या तिथल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं आणि शांतता पूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्य दलांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक सुरू असल्याची माहिती मिळत आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

27 जूनला होणार यूपीएससीची पूर्वपरीक्षा

27 जूनला होणार यूपीएससीची पूर्वपरीक्षा
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून ...

बंगाल निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौर्‍या, ...

बंगाल निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौर्‍या, राज्यातील 21 जागांवर परिणाम होऊ शकतो
कोलकाता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सुमारे 1 वर्षानंतर परदेश दौर्‍यावर जात ...

तामिळनाडू भाजपने राहुल गांधींवर निवडणूक आचार संहितेचे ...

तामिळनाडू भाजपने राहुल गांधींवर निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन करण्याचा आरोप केला
काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांनी आचार संहितेचे उल्लंघन करण्याचा आरोपाखाली राज्यात ...

पुणे आणि सूरतशी जोडले जाईल इंदौर, दोन एयरलाईन्सने सहमती

पुणे आणि सूरतशी जोडले जाईल इंदौर, दोन एयरलाईन्सने सहमती
देवी अहिल्याबाई होळकर अंतरराष्ट्रीय एयरपोर्टहून लवकरच गुजरातचे प्रमुख शहर सूरत आणि ...

केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ...

केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडून यासंदर्भात सर्व पूर्तता झाली असून ...