या महिला महापौरांना आली दाऊदची धमकी

daud abrahim
Last Modified गुरूवार, 19 सप्टेंबर 2019 (10:24 IST)
गुंड, देहासद्रोही व आतंकवादी असलेला दाऊद आपल्या देशातून कधीच पळून गेला आहे. मात्र त्याचा नावाचा वापर अजूनही अनेक नामचीन गुंड करतात आणि सामान्य माणसाला धमकी देतात. असाच प्रकार ठाणे येथे घडला आहे. विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर असताना ठाण्याच्या महिला महापौर मिनाक्षी शिंदे यांना धमकीचा फोन आला आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम आणि छोटा शकील यांच्या नावे हे फोन आले आहेत. या फोनद्वारे शिंदे यांच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोन नुसार तुम्हाला कुटुंबात राहायचे आहे ना, तर व्यवस्थित राहा, ठाण्यात कोणाशीही पंगा घेऊ नका अशा पद्धतीने धमकावण्यात आले आहे. याबाबत मिनाक्षी शिंदे यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महापौर शिंदे यांना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता, त्यांनी हा फोन उचलल्यानंतर तुम्ही मिनाक्षी शिंदे बोलता का असे विचारले. त्यावेळी मिनाक्षी यांनी हो, तुमचे काम काय असा प्रश्न विचारला. त्यानंतर फोन केलेल्या व्यक्तीने मी डोंगरीवरुन दाऊदचा माणूस बोलतो आहे असे सांगित
त्यांना म्हणाला की तुम्ही ठाण्यात खूप भांडणं करता. व्यवस्थित राहत नाही. यापुढे जर तुम्ही नीट राहिला नाहीत. तर तुम्हाला उचलून नेऊ, तुमच्या कुटुंबियांना त्रास देऊ अशी धमकी दिली. त्याशिवाय या पुढे नीट राहायचे अशी दमदाटीही या गुंडांकडून महापौरांना करण्यात आली. पोलिसांनी या गंभीर घटनेची लगेच नोंद घेतली असून, तपास सुरु केला आहे.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत बायोटेकमध्ये पोचले, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत बायोटेकमध्ये पोचले, कोवैक्सीनच्या तयारीचा आढावा घेतील
कोरोनाव्हायरसच्या वाढत्या कहरात लसची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. आज स्वत: पंतप्रधान ...

Live: पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कमध्ये ...

Live: पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कमध्ये दाखल झाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद येथे भेट देणार आहेत म्हणजे ...

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: प्रथम ते बारावीचे ...

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: प्रथम ते बारावीचे विद्यार्थी दहा दिवस बॅगशिवाय जातील
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उपसचिव सुनीता शर्मा यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत ...

उत्तर प्रदेशात लढायला सज्ज शेतकरी; दिल्ली-डेहराडून ...

उत्तर प्रदेशात लढायला सज्ज शेतकरी; दिल्ली-डेहराडून महामार्गावर केला चक्का जाम
उत्तर प्रदेशचा शेतकरी आज शेतीच्या बिलाबाबत रस्त्यावर दिसला आहे. या सरकारचा हा (कृषी ...

बाप्परे, दिल्लीहून विमानाने आलेले 12 प्रवासी कोरोना बाधित

बाप्परे, दिल्लीहून विमानाने आलेले 12 प्रवासी कोरोना बाधित
नागपूरमध्ये दिल्लीहून विमानाने आलेले 12 प्रवासी कोरोना बाधित निघाले आहेत. त्यामुळे नागपूर ...