मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > शेअर बाजार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
निर्देशांकाचा सहा आठवड्यातील उच्चांक
भाषा
मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने दोनशे सदतीस अंशाची झेप घेताना सहा आठवड्यातील उच्चांक नोंदवला आहे. बँकिंग, धातू व रियालीटी क्षेत्रातील भक्कम समभागांची फंडांनी जोरदार खरेदी केल्याने निर्देशांकाने झेप घेतली.

तीन सत्रात वृद्धी नोंदवणार्‍या निर्देशांकाने दोनशे सदतीस अंकाची वृद्धी नोंदवून 16,481.20 अंशापर्यंत मजल मारली. चार मार्चनंतर पहिल्यांदाच निर्देशांक या स्तरावर पोहचला आहे. निर्देशांकाने दिवसभरातील 16,570.57 अंशांचा उच्चांक व 16, 397.17 अंशाचा निच्चांकही गाठला.

राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांकानेही 4984.95 अंशापर्यंत झेप घेतल्यानंतर 71.10 अंशांची वृद्धी नोंदवत 4958.40 अंशापर्यंत पोहचला. शेअर बाजारात सकारात्मक बदल नोंदवला गेल्याने यावर्षीचा मान्सून चांगला जाईल, याबाबत आशा व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी
बाजारात पडझड सुरूच
गुंतवणूकदारांनी केली 279 कंपन्यांची तक्रार
निर्देशांकात 300 अंशांची घसरणं
बाजारात सतर्कता वाढली
निर्देशांकात 488 अंशांची वाढ
ईंफोसीस, विप्रोस शेअर बाजाराचा फटका