महागाईचा वाढता दर आणि तेलांच्या वाढलेल्या किंमतींमुळे याही आठवड्यात भारतीय शेअर बाजारात चढ-उतारांचा खेळ सुरूच राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
गेल्या आठवड्यात विक्रीचा जबरदस्त दबाव असल्याने बाजारात 843. 39 अंशांची घसरण दिसून आली. राष्ट्रीय बाजार अर्थात निफ्टीतही 242.3 अंशांची घसरण दिसून आली होती.
अर्थतज्ज्ञांच्या मते महागाईदर 8.24 टक्क्यांवर पोहचल्याने बाजारात चढ-उतार याही आठवड्यात दिसून येतील. यामुळे गुंतवणूकदार याही आठवड्यात जोरदार विक्री करतील.
कच्च्या तेलाचे वाढलेले भाव बाजारासाठी प्रतिकूल असून याचा परिणाम चालू आठवड्यात आपल्याला दिसून येईल असे मत दिल्ली शेअर बाजाराचे माजी अध्यक्ष अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.
|