1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

बीएसई अध्यक्ष शेखर दत्ता यांचा राजीनामा?

मुंबई शेअर बाजाराचे(बीएसई) अध्यक्ष शेखर दत्ता यांच्या अचानक राजीनाम्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यासह एक सदस्य जमशेद गोदरेज यांनीही राजीनामा दिला आहे.

त्यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. बीएसईने या दोघांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही. सेबीच्या निर्देशांवरून या दोघांनी राजीनामे दिल्याचे वृत्त काही वृत्त वाहिन्यांनी दिले असून, अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही.