मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > शेअर बाजार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
शेअर बाजारही कोसळला  Search similar articles
आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा मंदीचे वारे वाहू लागल्याने आणि डाव्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय बाजारातही घसरणं दिसून आली.

सत्राच्या प्रारंभीच 300 हून अधिक अंशांनी कोसळलेले बाजार बंद होताना 176.34 तर निफ्टी 41 अंशांनी घसरत बंद झाला. डाव्या पक्षांनी पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती. यानंतर समाजवादी पक्षाने सरकारला आपला पाठिंबा जाहीर केल्यानंतर बाजार काही अंशी सावरला. परंतु सपाची ही घोषणा बाजाराला फारसा आधार देऊ शकली नाही.

अमेरिकी शेअर बाजारात पडझड झाल्यानंतर आशियाई बाजारातही घसरणं सुरू झाली. सत्राच्या प्रारंभी मुंबई शेअर बाजार कालच्या 13525.99 अंशांच्या तुलनेत 13292.80 अंशांवर जास्तीत जास्त 13451.67 अंश आणि 13049.96 अंशांवर घसरल्यानंतर 176.34 अंश अर्थात 1.30 टक्क्यांच्या नुकसानीसह 13349.65 अंशांवर बंद झाला.
आणखी
मुंबई शेअर बाजारात पुन्हा पडझड
शेअर बाजार 700 अंशांनी वधारला
बाजारात विक्रमी घसरण
मुंबई शेअर बाजारात पडझड सुरूच
महागाईच्या पुरात बाजार गेला वाहून
अमेरिकी बाजारही धाराशाही