मुंबई शेअर बाजाराची नवीन भरारी
जागतिक मंदीच्या फटक्यात अडकल्याने धारातीर्थी पडलेल्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने गेल्या आठवड्यात चमकदार कामगिरी केली.
रिझर्व्ह बँकेने रेपो दर आणि सीआरआर दरात कपात करण्याचा निर्णय घेतला, त्या पाठोपाठ बाजारात मोठ्या प्रमाणावर चलनपुरवठा झाल्याने मुंबई शेअर बाजारात 1086.99 तर राष्ट्रीय बाजारात 301.6 अंशांची वाढ दिसून आली.
दीपावलीच्या शुभमुहूर्तावर बाजारात नवीन आशा निर्माण झाल्याने शुक्रवारपर्यंत बाजारात 12.49 टक्के अर्थात 1086.99 अंशांची वाढ दिसून आली आणि बाजार 9788.06 अंशांवर बंद झाला. निफ्टीतही 301.6 अंशांची वाढ झाल्याने निफ्टी 2885.60 अंशांवर आला.