1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

सलग सहाव्या आठवड्यात बाजारात तेजी

अन्न-धान्यांचा निर्देशांक उतरल्याने व देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळाल्याने भारतीय बाजारात सलग सहाव्या आठवड्यात तेजी दिसून आली. नुकत्याच संपलेल्या आठवड्याच्या अखेरच्या दिवशी बाजार वधारत बंद झाले.

आगामी काळात मात्र बाजाराच्या तेजीला ब्रेक लागण्याची शक्यता असून, रिझर्व्ह बँकेने रेपो व रिव्हर्स रेपो दरात केलेल्या वाढीमुळे बाजारात घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांना वाटत आहे.

मागील आठवड्यात बीएसईचा निर्देशांक 411.61 अंशांनी उसळत 17578.23 अंशांवर गेला. यापूर्वीच्या आठवड्यात तो 17166.62 अंशांवर बंद झाला होता.

राष्ट्रीय बाजाराचा निफ्टीही 125.8 अंशांनी वधारत 5262.80 अंशांवर बंद झाला. मिडकॅप व स्मॉल कॅप निर्देशांकातही चांगली वाढ दिसून आली.
About Writer
वार्ता