बच्चन कुटुंबाचा आधारः तेजी बच्चन
तेजी बच्चन यांच्या निधनाने बच्चन कुटुंबाचा आधार कोसळला आहे, म्हटले तर वावगे ठरणार नाही. हिंदीतील प्रसिद्ध कवी हरीवंशराय बच्चन यांची पत्नी असलेल्या तेजी पुढे सुपरस्टार व महान अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आई म्हणूनच जास्त ओळखल्या जाऊ लागल्या. पण त्याहीपेक्षा त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं.
तेजी या हरिवंशराय यांच्या दुसरी पत्नी होत्या. पहिली पत्नी श्यामा यांच्या निधनानंतर श्री.बच्चन यांनी तेजी यांच्याशी प्रेमविवाह केला. तेजी व हरिवंशराय यांची भेट एका कवीसंमेलनात झाली. त्यावेळी मधुशाला या काव्यसंग्रहामुळे हरिवंशराय प्रसिद्धीच्या झोतात होते.
नेहरू घराण्याशी घनिष्ठ संबंध
तेजी अलाहाबादमध्ये सामाजिक कार्यकर्ती म्हणून व एक रंगकर्मी म्हणून ओळखल्या जात होत्या. पंडीत नेहरूंचे घर असलेल्या आनंदभवनातही त्यांचे येणे जाणे असायचे. तेथेच पंडित नेहरूंशी त्यांची पहिली भेट झाली. त्यानंतर तेजी यांनीच नेहरू व हरिवंशराय यांचा परिचय करवून दिला. पुढे बच्चन व नेहरू कुटुंबात जे घनिष्ट संबंध निर्माण झाले त्याचे रोप तेजीजींनी लावले होते.
हरिवंशराय यांना ब्रिटनमध्ये पीएचडी करण्यासाठी तेजी यांनीच पाठविले होते. बच्चन कुटुंब अलाहाबादमधून दिल्लीत आले तेव्हा तेजी तेथेही रंगभूमीवर काम करत होत्या. अमिताभला अभिनयाकडे नेण्यात तेजी यांचे योगदान मोठे होते.
महानायकाची मूळ प्रेरणा
तेजी यांनी शब्द टाकल्यामुळेच ख्वाजा अहमद अब्बास यांच्या सात हिंदूस्थानी या चित्रपटात अमिताभला काम मिळाले होते. त्यानंतरच अमिताभचा फिल्मी प्रवास सुरू झाला. त्यानंतरच तो महानायक बनला. त्याच्या महानायक बनण्यामागे तेजी यांचा त्याग व परिश्रम महत्त्वाचे आहेत.
अमिताभच्या शब्दात आई
एका मुलाखतीत आपल्या आईबद्दल बोलताना अमिताभ म्हणतात, की ``माझा जन्म आई आणि बाबूजींसारख्या आई-वडिलांच्या घरी झाला हे मी माझे भाग्य समजतो. माझ्यावर चांगले संस्कार करण्याचे संपूर्ण श्रेय त्यांना जाते. वस्तुतः ते दोघेही अतिशय वेगळ्या वातावरणात, संस्कारात वाढलेले होते. आई एका श्रीमंत शीख घराण्यातली मुलगी, तर बाबूजी कनिष्ठ मध्यमवर्गीय कायस्थ कुटुंबातून आले होते. आई लाहोरसारख्या त्यावेळच्या आधुनिक शहरात वाढलेली, तर बाबूजी ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक व साहित्यिक नगरी समजल्या जाणाऱ्या अलाहाबादमध्ये रहात होते. दोन्ही कुटुंबांची कौटुंबिक मुल्ये अतिशय उच्च होती. पण सामाजिक दर्जानुसार दोन्ही कुटुंबे दोन ध्रुवांवर होती. एक पाश्चात्य तर दुसरे पौर्वात्य. आईचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले तर वडिलांचे हिंदी व फारसीत. पण दोघांत एक बाब मात्र समान होती, ती म्हणजे धार्मिक श्रद्धा. त्यामुळेच लहानपणापासून रामचरितमानस आणि गुरूवाणी दोन्ही कानावर पडायचे. आजचा मी जो काही बनलोय ते या मिश्रणातूनच.``
अमिताभचे शिक्षण आणि तेजी
अमिताभ यांचे इंग्रजी माध्यमात शिक्षण झाले. त्यामागे तेजी यांचा आग्रह होता. त्यासंदर्भात हरिवंशराय यांच्यासी त्यांचे मतभेदही झाले होते. याविषयी बोलताना याच मुलाखतीत अमिताभ म्हणाले होते, की `` जे झालं, ते योग्य झालं असं मला आजही वाटतं. पूर्व व पश्चिम यांच्यातील मिश्रण खऱ्या अर्थाने आमच्यात आलं. बाबूजींना आपल्या मातृभाषेप्रती अतूट प्रेम होते, ते अगदी स्वाभाविकही होतं. त्याचवेळी आईवर पाश्चात्य विचारांचा प्रभाव होता. येणाऱ्या काळाची पावलं कदाचित तिने ओळखली असावीत. बाबूजी स्वतःशी व आपल्या परिस्थितीवर संतुष्ट होते. आजच्या ग्लोबल व्हिलेजचे वातावरण पाहून तिने त्यावेळी घेतलेला निर्णय किती खरा होता, ते आज कळतंय. विकसित देशांमध्ये जी आऊटसोर्सिंग होते आहे, ती बरीचशी भारतात होते आहे. कारण आम्ही हिंदी भाषक तर आहोच, पण आम्हाला इंग्रजीही चांगले समजते. .``