भारतीय प्रजासत्ताकाची ५८ वर्षे- वाचकांच्या नजरेतून
|
२६ जानेवारी १९५० मध्ये भारतात घटना लागू करण्यात आली आणि भारत प्रजासत्ताक झाला. तेव्हापासून आतापर्यंत देशभरातील नद्यांतून बरेच पाणी वाहून गेले. या काळात भारत कितीतरी बदलला. युद्ध आणि दुष्काळाची संकटे सहन केली. त्याचवेळी प्रगतीची नवी शिखरेही गाठली. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला. आता तर जगभरात भारतीय बुद्धिमत्ता राज्य गाजवते आहे.
भारताच्या या सगळ्या प्रवासाबाबत तुम्हाला काय वाटते? याविषयी आपले मत जाणून घ्यायला आणि ते इतरांपर्यंत पोहोचवायला आम्ही उत्सुक आहोत. यासाठी सुरू करत असलेल्या चर्चेत आपले स्वागत आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या या वाटचालीबद्दल आपण समाधानी आहात की असमाधानी? भारताबद्दलची आपली स्वप्ने काय आहेत? ती कशी साकारायला हवी? या सगळ्या पैलूंवर आपण आपली मते मुक्तपणे व्यक्त करू शकता. मग उशिर कशाला? सामील व्हा.

