पंचशील : नव्या युगाचे
(जडण-घडण मासिक आणि सह्याद्री प्रकाशन यांच्या वतीने स्मिता देशपांडे यांनी अनुवादित केलेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे 'पंचशील : नव्या युगाचे' हे पुस्तक डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशित झाले. डॉ. माशेलकर यांचे या पुस्तकातील काही विचार....)
आपल्या सर्वांनाच आठवत असेल, 3 जानेवारी 2000 रोजी पुण्यामध्ये राष्ट्रीय सायन्स काँग्रेस भरवण्यात आली होती. सुमारे पाच हजार शास्त्रज्ञ आणि इतर पाहुणे उद्घाटनाच्या समारंभाला हजर होते. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या बरोबरीनं शरद पवार, डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम (जे नंतर भारताचे राष्ट्रपती झाले) हजर होते. या सायन्स काँग्रेसमध्ये दोन-तीन गोष्टी पूर्वीच्या सायन्स काँग्रेसपेक्षा वेगळ्या होत्या. त्यामुळेच ही सायन्स काँग्रेस पूर्वीच्या सायन्स काँग्रेसपेक्षा उठावदार ठरली.
पुण्यातील या मुख्य सायन्स काँग्रेसच्या जोडीनं 'चिल्ड्रेन्स सायन्स काँग्रेस' भरविण्यात आली होती. 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यामध्ये उत्साहाने भाग घेतला. ती भाषणं करत होती. नवनवीन प्रयोग करत होती, संयोजन करत होती आणि त्यामध्ये प्रेक्षक, सहभागी होणारे विद्यार्थी खूपच होते. पुणे सायन्स काँग्रेसचं अजून एक वैशिष्टय म्हणजे त्यामध्ये केवळ शास्त्रज्ञच आले नव्हते, तर शास्त्रांव्यतिरिक्त इतर ज्या ज्ञानशाखा आहेत त्याही पाहणं महत्त्वाचं असल्यामुळे आम्ही ज्याला नवनिर्माणकर्ते म्हणतो, (Grass Root Innovators), तेही या सायन्स काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते, मग ते कारागीर असोत किंवा शेतकरी, किंवा अशिक्षित नवसर्जनशील असोत, त्यांनी केलेल्या कामाचं एक प्रदर्शन त्या वेळी झालं होतं. मला आठवतंय, ज्या व्यासपीठावरून नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञांची भाषणं झाली होती त्याच व्यासपीठावरून या अशिक्षित नवनिर्माणकर्त्यांची भाषणं झाली आणि नोबेल पुरस्कारविजेत्यांना जो टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला त्याच्यापेक्षा किती तरी अधिक प्रतिसाद यांना मिळाला. त्यांनी त्याच्या भाषेत त्यांचे विचार मांडले. त्यांना मिळणारा टाळ्यांचा प्रतिसाद अजूनही माझ्या कानात घुमतो आहे.... खूपच अभूतपूर्व होते ते सगळं.
या सायन्स काँग्रेसमध्ये आणखी एक उपक्रम वेगळा होता. त्या वेळी एक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. भारताने आतापर्यंत ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान यांच्या क्षेत्रात जे काही मिळवलंय त्याच्या संदर्भात हे प्रदर्शन होतं. मिसाईलच्या प्रतिकृतीपासून 'इंडिका' ही नवीन गाडी त्याचवेळेस बाजारात आली होती. तीसुद्धा या प्रदर्शनात ठेवली होती. त्या सुमारास 'कारगिल युद्ध' नुकतंच संपलं होतं. त्यावर आधारित संरक्षणाविषयक प्रदर्शनही इथं भरवण्यात आलं होतं. महत्त्वाचं म्हणजे या प्रदर्शनांना खूप गर्दी झाली होती. मला अजून आठवतं की, काही वर्तमानपत्रांचे मथळे होते ' Science Congress Causes Traffic Jams' अशी अलोट गर्दी या सायन्स काँग्रेसला झाली होती. महाराष्ट्रातल्या अनेक शाळांनी मुलांना हे प्रदर्शन पाहायला अगदी पुणे विद्यापीठातून शिवाजीनगर स्टेशनपर्यंत रांगाच्या रांगा लागल्या होत्या. अशा प्रकारचं प्रदर्शन याच्या आधी कोणीही बघितलं नव्हतं.
या सायन्स काँग्रेसमध्ये मी 'नवीन सहस्त्रकाचं नवीन पंचशील' या विषयावर भाषण केलं होतं. त्याचे पाच मुद्दे होते ते म्हणजे -
1. बालककेंद्रीत शिक्षण (Child Centred Education)
2. महिलाकेंद्रित कुटुंब (Women Centred Family)
3. मानवकेंद्रितविकास (Human Centred Development)
4. ज्ञानकेंद्रित समाज (Knowledge Centred Society)
5. नवनिर्मितीकेंद्रित भारत (Innovation Centred India)
सांगायला अत्यंत आनंद होतो की, या भाषणाचे पडसाद संपूर्ण भारतामध्ये उमटले. त्याच्या प्रतिक्रिया मला लगेच मिळाल्या. उद्घाटनाचा कार्यक्रम दुपारी संपला. सर्वांत शेवटचं भाषण पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं होतं. त्यानंतर आम्ही भोजनासाठी गेलो. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, नोबेल पुरस्कारविजेते प्रो. लेन, नोबेल पुरस्कारविजेते प्रो. अन्र्स्ट, प्रो. एम. जी. के. मेनन असे आम्ही एकत्र होतो. त्या वेळी मी मांडलेल्या पाच मुद्यांवर अनौपचारिक चर्चा झाली. त्यातील बालककेंद्रित शिक्षण हा मुद्दा महत्त्वाचा होता. हा मुद्दा मी मांडताना माझ्या शाळेतील भावेसरांचा उल्लेख केला होता. एकदा त्यांनी आम्हाला बाहेर नेलं आणि भिंगाचा प्रयोग दाखवला. भिंग सूर्यप्रकाशात धरलं आणि त्याखाली कागद ठेवला. काही क्षणातच तो जळू लागला. त्या भिंगाच्या नाभीय अंतरावर (फोकल लेन्थ) सूर्यप्रकाशातून येणारे किरण एकत्र येतात आणि एखादा कागदही जळू लागतो. आम्ही सगळेत आश्चर्यचकित झालो. ते माझ्याकडे वळून म्हणाले, 'माशेलकर, तुमच्या शक्ती अशाच एकत्रिक केल्या तर जगात तुम्हाला अशक्य म्हणून काही नसतं.' विज्ञानाच्या शक्तीनं मला प्रभावित केलं. त्याच वेळेला मी ठरवलं की मी वैज्ञानिक होणार. भावेसरांच्या त्या वाक्यानं मला माझ्या जीवनाचं तत्त्वज्ञान, सूत्रही मिळालं. 'जर आपण फोकस केलं, शक्ती केंद्रिक केल्या तर तुम्ही काहीही करू शकता...'
भावेसरांचं उदाहरण सर्वांना फारच भावलं. त्या अनुषंगानं आमच्या चर्चा झाल्या. नोबेल पुरस्कारविजेते प्रो. अन्र्स्ट म्हणाले की, 'मुलांच्या आयुष्याला वळण देणारे, त्यांच्या मनाची मशागत करणारे, त्यांना दिशा देणारे शिक्षक आजकाल शाळांमध्ये खूप कमी झालेत आणि सगळीकडेच हे चित्र आहे.' दुसरे नोबेल पुरस्कारविजेते प्रो. लेन यांनीही हीच खंत व्यक्त केली. या सत्य परिस्थितीकडे कोणालाच पाठ फिरवता येणार नाही. पण या सगळ्यांपेक्षा मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो तो पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा. ते मला हळूच हिंदीतून म्हणाले, 'तुम्हाला माहीत आहे का, की आजकाल भावेसरांसारखे शिक्षक का दिसत नाहीत? ' मी म्हणालो, 'नाही, मला कळत नही की आजकाल असे शिक्षक दिसायल काय हरकत आहे!' यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते मोठं मार्मिक होतं. ते म्हणाले, 'समाजात आजकाल भावेसर दिसत नाहीत. कारण पूर्वी जशी त्यांना प्रतिष्ठा मिळत होती तशी प्रतिष्ठा त्यांना आता मिळत नाही.' किती खरं आहे हे ! आपण आज समाजाकडे वळून पाहिलं की दिसतं, तीस-चाळीस वर्षांपूर्वी जशी परिस्थिती होती, जो आदर, जी प्रतिष्ठा शिक्षकांना दिली जायची ती प्रतिष्ठा आजकाल दिली जात नाही. ध्येयवादी, निष्ठावान अशा व्यक्ती शिक्षक व्हायच्या, आज असं घडताना दिसत नाही. जेव्हा पुन्हा असंच दिसेल तेव्हा नक्कीच भावेसरांसारखे मुलांच्या आयुष्याची जडण घडण करणारे, त्यांना दिशा देणारे शिक्षक तयार होतील.
संध्याकाळीही या भाषणाविषयी मला फोन आला. हे भाषण संपूर्ण भारतात दाखवण्यात आलं होतं. हे भाषण आवडल्यांच, स्फूर्तिदायक झाल्याचं सांगणारे मला अनेक फोन आले. त्यातील काही प्रतिक्रिया, कृती मला सर्वाधिक महत्वपूर्ण वाटतात. सायन्स काँग्रेस संपल्यावर मी जेव्हा पुन्हा दिल्लीच्या सी.एस.आय.आर.च्या ऑफिसमध्ये गेलो, तेव्हा बिहारमधील एक खासदार मला भेटायला आले. ते या भाषणानं खूपच प्रभावित झाले होते. त्यांनी माझ्याकडून या भाषणाचीं इंग्रजी प्रत घेतली आणि त्याचं हिंदी भाषांतर करून त्या पुस्काच्या 5000 प्रती त्यांनी बिहारमधल्या शाळांना, शिक्षकांना वाटल्या. मला हे खूपच महत्त्वपूर्ण वाटतं. या भाषणावर भारतामध्ये अनेक ठिकाणी चर्चासत्रे झाली. त्यातील जयपूर आणि पुण्यातलं सत्रं मला विशेषत्वानं आठवतं.
गंमत म्हणजे ऑस्ट्रियामध्ये 'वेबवर्न' हे ऑस्ट्रबॅक टेक्नॉलॉजी फोरमचे प्रमुख होते. त्यांच्या वाचनात हे पंचशील आलं. त्यांना ते इतकं आवडलं की या विषयावर व्याख्यान देण्यासाठी त्यांनी मला आणि माझ्या पत्नीला ऑस्ट्रेलियाला निमंत्रित केलं. हळूहळू काही अजून प्रतिक्रिया कळल्या. त्यातील या प्रतिक्रियेने मला खूप आनंद झाला. श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठाच्या बी.एड्. अभ्यासक्रमात त्यांनी पेपर-1 मध्ये' पंचशील'चा समावेश केला आहे. त्यांच्या नवीन भारतीय समाजाच्या उभारणीमध्ये 'शिक्षण आणि शिक्षकांचे योगदान' या पेपरमध्ये - 'नव्या युगाचे पंचशील प्रत्यक्षात आणताना शिक्षणात करावयाचे बदल' असा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे, त्यात माझ्या भाषणाचा संदर्भ आणि त्याचे पाच मुद्दे िदले आहेत. खूप वेळा सायन्स काँग्रेसमधील भाषण लगेचच विसरलं जातं, परंतु आज आठ वर्षांनीसुद्धा त्या भाषणाचे पडसाद मला ऐकू येतात आणि बरं वाटतं.
3 जानेवारी 2000 ला मी नवीन पंचशील मांडलं होतं. आज या घटनेला आठ वर्ष झाली. मी जे पाच मुद्दे त्या वेळी मांडले होते त्यातला पहिला मुद्दा होता 'बालककेंद्रित शिक्षण!' आपल्या सगळ्या शिक्षणपद्धतीमध्ये मुलांना शिक्षण देताना केवळ पाठांतरावर आपण अधिक भर देतो, अशी खंत मी त्यामध्ये व्यक्त केली होती. शिक्षण आनंददायी असू शकतं याचा विचारच होत नाही. शिक्षणातून आनंदाची अनुभूती देण्याचा प्रयत्न कुठेच होत नाही अशी खंत मी व्यक्त केली होती, पण गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षणातील विविध प्रयोगांबद्दल मी ऐकून आहे. आपण मुलांसाठी असंच प्रयोगशील बनलं पाहिजे आणि मुलांनाही प्रयोगशील बनवलं पाहिजे, त्या दिशेनं नक्कीच आजचं वातावरण आशादायी आहे.
याच संदर्भात एक उदाहरण द्यावंसं वाटतंय. अगदी अलीकडे 19 मार्च 2008 रोजी रात्री मेरिको फाऊंडेशनतर्फे प्रेमजी फाऊंडेशन आणि पाच राज्यांना एक पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये मी जे बालककेंद्रित शिक्षणात शिकणं आणि शिकवणं याबद्दल काही मुद्दे मांडले होते, त्यांना मार्गदर्शक धरून शिक्षणात काही अभिनव प्रयोग काही हजार शाळांमध्ये झालेले दिसले. अशा प्रकारचे प्रयोग काही शाळांमध्ये अजूनही होत आहेत. ही खूपच आनंदाची गोष्ट आहे.
मी एक मुद्दा मांडला होता की, तरुण मुलं विज्ञानाकडं वळत नहीत, जी वळतात - विज्ञानाचा अभ्यास करतात ती पुढं विज्ञान शाखेत टिकत नाहीत. यातही आज बराच बदल झालाल. मुलं आज नवनवीन प्रयोगात येत आहेत हे खूपच आशादायक चित्र आहे. सी.एस.आय.आर.नं 'सी.पी. व्हायोलेस' असा एक उपक्रम सुरू केला आहे. केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने 'किशोर वैज्ञानिक' ही योजना, तसंच सध्या 'इन्स्पायर' हा उपक्रम सुरू केलाय. 10 लाख मुलं विज्ञान शिक्षणाकडे कशी वळतील, प्रयोगांकडे कशी वळतील याचेही शासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत.
सांगयचा मुद्दा हा की, मुलांच्या शिक्षणाबद्दल, शिक्षणपद्धतीबद्दल विधायक, प्रयोगशील बदलांना नव्या दमानं सुरुवात झालेली आहे. काही प्रयत्न शासकीय पातळीवरून होत आहेत. काही व्यक्ती, संस्था त्यामध्ये पुढाकार घेत आहेत. आपण मुलांच्या शिक्षणाबद्दल इतके जागरूक होत आहोत ही खूपच आनंदाची आणि आशादायक बाब आहे.
पुढचा मुद्दा होता तो 'महिलाकेंद्रित कुटुंब'. मला आनंद होतो की, मी इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीचा अध्यक्ष असताना या विषयावर केवळ चर्चाच झाली असं नाही तर, 'विज्ञानातील स्त्रिया आणि स्त्रियांसाठी विज्ञान' (Women in Science & Science for Woman) यावर सखोल विचारविनियम करून एक अहवाल तयार करण्यात आला. ज्या सूचना त्या अहवालामध्ये करण्यात आल्या त्यांना अनुसरून भारत सरकारनं स्त्रियांसाठी नवनवीन योजना सुरू केल्या आहेत. या योजना सध्या विज्ञान-तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. स्त्री-भ्रूणहत्यांचं शिक्षित भागातील प्रमाण बघता शिक्षणाबरोबर आपली मानसिकताही घडवण्याची वेळ टळून जाऊ नये याकडे लक्ष द्यायला हवं.
तिसरा मुद्दा मी मांडला होता की इंग्रजीतील पाच 'इ'ज चा समतोल राहायला हवा. ते म्हणजे इकॉलॉजी, इन्व्हायर्नमेंट, इकॉनॉमिक्स, इक्विटी आणि इथिक्स. आपण विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरून विकास करत असताना या पाच 'इ'जचा समतोल राखला तरच तो खर्या अर्थानं मानवकेंद्रीत विकास ठरेल, असा तो मुद्दा होता. आज यामध्ये बदल होत आहे. सस्टनेबल डेव्हलपमेंट (Sustainable Development) म्हणजे टिकाऊ विकासाची संकल्पना पूर्वी मांडली जायची. आज सस्टनेबल कन्झम्पशनची संकल्पनाही विचारवंत मांडू लागले आहेत. टिकाऊ उपयोग, थोडक्यात केवळ भांडवलदारांचा विकास, जी.डी.पी.च्या आकड्यांना फुगवटा म्हणजेच विकास या संकल्पना बदलू लागल्या आहेत. त्याच्याच बरोबरीनं ग्राहकांचा विचार, आज त्यांचं समाधान, त्यांची वाढती शक्ती याचाही आर्थिक विकासात विचार होताना दिसतो. गरिबांचा विचार प्राधान्यानं करणार्या (Co-poor Policy) योजना आज मांडण्यात येत आहेत.
अकराव्या पंचवार्षिक योजनेचा केंद्रबिंदू 'सर्वसमावेशक विकास' (Inclusive Growth) हाच आहे. सर्वसमावेशक विकास म्हणजेच आजपर्यंत ज्यांचा विकासात अंतर्भावच नव्हता त्यांना विकासात सामावून घेणं (Inclusive means including those who have been exclused so far.) असं झालं तरच तो विकास सर्वदूर पसरेल. असा विकासच टिकाऊ ठरेल. पूर्वी भारत किंवा भारतामध्ये विकास, वाढ याबद्दल सारखंच बोललं जायचं, पण आज खर्या अर्थानं आपण विकसित होण्याच्या दिशेनं पाऊल उचललेलं आहे. 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आज साठ वर्षांनी आपण Independent India वरून Incredible India अर्थात अतु्ल्य भारताबद्दल बोलायला लागलो आहोत, जेव्हा आपण सर्वसमावेशक भारताबद्दल विचार करू तेव्हाच अतुल्य भारत निर्माण होईल. जेव्हा आपण सगळ्यांनाच भारताच्या अतुलनीय होण्यामध्ये सामावून घेऊ तेव्हाच खर्या अर्थाने आपण स्वतंत्र भारत घडवू शकू. आज मानवकेंद्रित विकास या मुद्दयामधून सर्वसमावेशक विकासाचे प्रयत्न आणि प्रयास होत आहेत या गोष्टीचा मला आनंद वाटतो आहे.
चौथा मुद्दा होता तो ज्ञानाधिष्ठित समाजाचा. 'सर्वांना पाणी, सर्वांना शिक्षा, सर्वांना आरोग्य' या घोषणा आपण जशा देतो तसंच 'सर्वांना ज्ञान' ही घोषणाही करायला हवी. यामध्ये मी जो ज्ञानावर भर दिला होता त्या अनुषंगानं अनेक चर्चा झाल्या. काही संस्थाही उभ्या राहिल्या. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञान आयोगाची (Knowledge Commission) स्थापना केली. त्यातून आता नवनवीन योजना मांडल्या जात आहेत. 'ज्ञान उद्योगा' बद्दल (Knowledge Industry) मी यामध्ये भर दिला होता. माहिती-तंत्रज्ञान, उद्योग, जैव-तंत्रज्ञान, फार्मास्युटिकल तंत्रज्ञान या ज्ञानावर आधारित उद्योगांवर, त्यांच्या विकासावर देशानं अधिक भर द्यायला हवा हा मुद्दा मी त्या वेळी मांडला होता. गेल्या आठ वर्षांत माहिती तंत्रज्ञानानं प्रचंड प्रगती केली आहे हे पाहून आज आनंद होतोय. जैव तंत्रज्ञानामध्येसुद्धा भारताची घोडदौड चालू आहे. विशेष म्हणजे ज्ञानावर आधारित जे उद्योग आहेत त्यांना भारत सरकारनं अनेक सवलती द्यायला सुरुवात केली आहे. ज्ञानाधिष्ठित समाज हा मुद्दा मांडताना मी म्हटलं की, 'भारत हा असा देश आहे की, त्याकडे सबंध जगाचं लक्ष वळेल.' भारत हे ग्लोबल नॉलेज प्रोड्युसिंग सेंटर होईल. जगातील अनेक उद्योगांचं लक्ष भारताकडे वळेल. आज आठ वर्षांनी हे भाकीत प्रत्यक्षात उतरलेलं दिसून येतंय. आठ वर्षांत जवळजवळ 300 बहुराष्ट्रीय उद्योगांचे संशोधन व विकास प्रकल्प भारतात आले आहेत. हे नक्कीच स्पृहणीय आहे. यामुळे भारतातून परदेशात गेलेली, जाणारी जी तरुण पीढी होती ती पुन्हा भारतात परतत आहे. गेल्या तीन वर्षांत नॅसकॉमच्या सर्वेक्षणानुसार तीस हजारपेक्षा जास्त शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, इंजिनीयर्स आज भारतात परत आलेले आहेत. आपण पूर्वी ब्रेन-ड्रेनविषयी चिंतेत होतो. आता मात्र आपण ब्रेन- गेन (Braingain) आणि ब्रेन सर्क्युलेशन (Brain-Circulation) कसं होईल यावर चर्चा करायला हवी.
पाचवा मुद्दा होता तो नवनिर्माण केंद्रित भारताचा. आज या क्षेत्रातही भारतानं स्पृहणीय, अभिमानास्पद प्रगती केलेली आहे. मी स्वत: याचा साक्षीदार आहे. राष्ट्रीय नवनिर्माण फाऊंडेशन (National Innovation Foundation) ची स्थापना 2000 साली झाली. याचा मी अध्यक्ष आहे. मी मॅरिको इनोव्हेशन फाऊंडेशनचा अध्यक्ष आहे. रिलायन्स इनोव्हेशन कौन्सिलचा अध्यक्ष आहे. अशा प्रकारे इनोव्हेशनवर संपूर्ण भारतातच आज जोर देण्यात येत आहे. यावर सांगावंसं वाटतं की, 1958 मध्ये भारतानं विज्ञानविषयक धोरणाबाबत ठराव केला. (Scientific Policy Resolution), 1983 मध्ये तंत्रज्ञानाच्या धोरणाबद्दल ठराव केला, त्यानंतर 2003 मज्ञध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक धोरणाबाबतचा ठराव केला. आपण जगात इतरत्र पाहिलं तर असं दिसेल की, तिथं केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयं नसून विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि नवनिर्माणाची मंत्रालयं आहेत. उदा. मलेशिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका. मला आजही असं वाटतं की, आपल्याला सायन्स टेक्नॉलॉजी अॅण्ड इनोव्हेशन पॉलिसी ठरवायला हवी. नुसतं विज्ञानाविषयी बोलून चालणार नाही, तर नवनिर्मिती करून विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार होणारी उत्पादनं आणि सेवा यांचा वापर समाजासाठी व्हायला हवा. अशा प्रकारे ही संपूर्ण साखळी आपण पूर्ण केली तरच आपण प्रगती साधू शकू, नाही तर आपण जागच्या मागे पडू.
मला वाटतं आपल्याला एक 'नवनिर्माण दिवस' (Innovation Day) साजरा करायला हवा. तो कधी तर 10 जानेवारी रोजी. 10 जानेवारीला टाटा मोटर्सनं 'नॅनो' या नवीन कारचं प्रदर्शन केलं, घोषणा केली. आज सर्व जगामध्ये नॅनोची चर्चा होत आहे, कारण ही सर्वात जास्त स्वस्त आणि पर्यावरणपूरक अशी कार आहे. कमीत कमी इंधन वापरून जास्तीत जास्त सेवा देणारी ही कार आहे. तिची किंमतही एक लाख रुपये आहे. डेट्रॉइटमध्ये, जीनिव्हामध्ये दोनही ठिकाणी कारची प्रदर्शनं होती. तिथं दोनही ठिकाणी केवळ आपल्या 'नॅनो'चीच चर्चा होती. मला वाटतं, गेल्या संपूर्ण शतकात आणि या शतकाच्या सुरुवातीला अशा प्रकारे बहुचर्चित असं उत्पादन कुठं झालं नाही. भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान-नवसर्जनशीलतेच्या इतिहास ही महत्त्वपूर्ण घटना आहे. म्हणूनच ज्याप्रमाणे आपण 28 फ्रेब्रुवारीला विज्ञान दिन साजरा करतो, 11 मेला तंत्रज्ञान दिन साजरा करतो, त्याप्रमाणे 10 जानेवारीला नवनिर्माण दिन साजरा करायला हवा. कारण संपूर्ण भारतासाठी 'नॅनो' हा अत्यंत अभिमानास्पद भाग आहे.
हे नवीन पंचशील मांडल्यावर शेवटी मी माझं स्वप्न सांगितलं होतं. इंडियाडॉटकॉमवरील भारताचं स्वप्न....
कित्येकांना ते निव्वळ दिवास्वप्न वाटेल. कसं पूर्ण होईल हे स्वप्न? त्या वेळी मी म्हटलं होतं, माझ्यासारख्या अत्यंत गरीब कुटुंबातून येणारा मुलगा जर इतका मोठा होऊ शकतो, संधी दिली तर प्रत्येक भारतीय हे करू शकेल. त्यासाठी प्रत्येक भारतीयानं रोज सकाळी उठल्यावर किमान पाच वेळा 'My India, My India' असं म्हटलं तरी ती गोष्ट आपल्याला प्रेरणा देईल. प्रत्येकाला स्फूर्ती मिळेल. नवभारत घडविण्याची. आपल्यातला आळस टाकून, सुप्त शक्ती जागी करण्यासाठी सातत्यानं रोज सकाळी म्हणू या 'My India, My India'.
|