मंथन | बाबा आमटे | मराठी दिन | गांधी जयंती | सावरकर | ब्लॉग-कॉर्नर
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » आज-काल » मंथन » मराठीची अवनतीः थोडे आत्मपरिक्षण
Feedback Print Bookmark and Share
 
भाषा ही संपर्काचं साधन आहे. आपल्या भावना, विचार आदिम माणूस देहबोलीतून व्यक्त करत होता. पुढे त्या बोलीला शब्द मिळाले. जिथल्या तिथल्या भाषा वेगळ्या होत गेल्या. ही दुसर्‍याशी संपर्क साधण्यास उपयुक्त ठरणारी भाषाच सध्या वादाचा विषय ठरतो आहे. मुंबईत मराठी भाषेवरून सुरू असलेले रणकंदन हे त्याचेच उदाहरण. या भाषक वादाला रोज नवे पैलू जोडले जात आहेत. मुंबईत रहाणार्‍या परप्रांतीयांना मराठी बोलता येत नाही, यासाठी त्यांना दोषी धरण्यापेक्षा याला मराठी माणूसच जास्त दोषी आहे, असे मला वाटते.

त्याच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडावेसे वाटतात. मुंबईत मराठी माणसांची संख्या ४२ टक्क्यांहून जास्त कधीच नव्हती. पुढे पुढे ती कमी कमी
  आधीच मुंबईत निम्म्याहून जास्त इतर प्रांतीय लोक असल्यामुळे मुंबई अधिकाधिक बहुसांस्कृतिक आणि बहूभाषक होत गेली. सहाजिकच बहुसांस्कृतिकतेच्या लोकांना कळेल अशा भाषेचे चलन सुरू झाले. ही भाषा अर्थातच हिंदी होती.      
होत गेली आणि मराठी माणूस उपनगरात रहायला गेला. याचे वेगवेगळे अर्थ आहेत. मुंबईत जमिनी व फ्लॅट्सचे भाव इतके वाढले की त्याला तिथेच राहून नवे घर घेणे परवडत नव्हते. त्याचवेळी चाळीत रहाणारा मराठी माणूस सांपत्तिकदृष्ट्या सुधारला होता. त्याला चांगले रहाणीमान हवे होते. त्याला त्या पैशात भलेही मुंबईत घर घेता येत नसले तरी उपनगरात चांगले घर मिळत होते. सहाजिकच तो मुंबईबाहेर गेला. मुंबईतले भाव परप्रांतीयांनी वाढविले या म्हणण्याला माझ्या मते तरी तितका अर्थ नाही. मुंबईची स्वतःची किंमतच एवढी आहे, की तीच भाववाढीला कारणीभूत ठरते. कारण प्रत्येक कंपनीला आपले ऑफिस मुंबईत हवे असते. याचे कारण मुंबईला लाभलेले आंतरराष्ट्रीय ग्लॅमर, महत्त्व. सहाजिकच मुंबईचा विस्तार होत असताना जागेची गरज वाढत गेली. परिणामी किमती वाढत गेल्या. या सगळ्यामुळे मराठी माणसाने उपनगरात जाणे पसंत केले.


  मुंबईतले भाव परप्रांतीयांनी वाढविले या म्हणण्याला माझ्या मते तरी तितका अर्थ नाही. मुंबईची स्वतःची किंमतच एवढी आहे, की तीच भाववाढीला कारणीभूत ठरते. कारण प्रत्येक कंपनीला आपले ऑफिस मुंबईत हवे असते. याचे कारण मुंबईला लाभलेले आंतरराष्ट्रीय ग्लॅमर.      
मुंबईच्या या एकूणच विस्तारामुळे सहाजिकच रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होत होती आणि आहे. सहाजिकच देशापरदेशातून नोकरदारांचा, व्यावसायिकांचा लोंढा मुंबईकडे न येता तरच नवल. या सगळ्यांच्या येण्यामुळे आणि आधीच मुंबईत निम्म्याहून जास्त इतर प्रांतीय लोक असल्यामुळे मुंबई अधिकाधिक बहुसांस्कृतिक आणि बहूभाषक होत गेली. सहाजिकच बहुसांस्कृतिकतेच्या लोकांना कळेल अशा भाषेचे चलन सुरू झाले. ही भाषा अर्थातच हिंदी होती. त्यात रोजगारनिर्मितीचे मोठे केंद्र असलेले हिंदी चित्रपटनिर्मितीचे केंद्र बॉलीवूड हेही मुंबईतच होते. त्यामुळे सहाजिकच हिंदीचे चलन मोठ्या प्रमाणात वाढले. हिंदीच्या या विस्तारापायी एकेकाळी वेळही अशी आली की भाषेप्रती अत्यंत जागरूक असलेल्या दक्षिण भारतीयांनाही मुंबईत रहाताना हिंदी शिकावी लागली. कारण मोठ्या जनसमूहाला ती भाषा समजत होती. मुंबईत मराठी भाषक लोक असले तरी त्यांची संख्या तुलनेने कमी असल्याने संपूर्ण जनव्यवहारात मराठीचे प्राबल्य निर्माण झाले नाही. त्याचवेळी त्यांना हिंदी सहजी समजत होते, हेही त्याचे कारण ठरले. गुजराती भाषकही मोठ्या प्रमाणात होते. पण म्हणून गुजराती भाषा ही मुंबईची भाषा बनली नाही. कारण सगळ्यांना सामावून घेईल, समजू शकेल अशी हिंदी भाषा होती. हिंदी चित्रपट हे त्यासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले.
 
संबंधित माहिती शोधा