ब्लॅक होलच्या निमित्ताने जगभरात खळबळ
|
काय झाले होते?
सायबेरीयात ३० जून १९०८ रोजी तुंगुस्का या अतिदूर असलेल्या भागातील जंगलात एक आगीचा गोळा येऊन पडला. त्यामुळे वीस मैल परिसरातील झाडे जळून गेली. या गोळ्याच्या आदळण्याने निघालेल्या लहरी अनेक देशांना जाणवल्या.
जगभरातील शास्त्रज्ञ या जागी गेले. त्यांनी मग त्याची कारणमीमांसा सुरू केली. काहींच्या मते उल्कापातामुळे हे घडले. काहींच्या मते तो धुमकेतू होता. अर्थात या दोन्हीच्या पुष्ट्यर्थ पुरावे मिळाले नाहीत. धुमकेतू असावा हे सांगणार्यांनुसार, आकाशात कसला तरी स्फोट झाला आणि त्याचा तुकडा जमिनीवर पडला असावा. काही शास्त्रज्ञांच्या मते हा गोळा म्हणजे दुसर्या एखाद्या ग्रहाचा तुटलेला भाग असावा. अवकाशात तीव्र गतीमुळे जोरदार घर्षण होऊन हे घडले असावे. या सर्व शास्त्रज्ञांनी आपापल्या मतांप्रमाणे या गोळ्याचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला. पण नेमके काय घडले ते पुराव्यानिशी कोणीही सांगू शकले नाही. या गोळ्याचे रहस्य आज इतक्या वर्षांनंतरही कायम आहे.
ब्लॅक होलचे रहस्य
आता प्रश्न आहे तो जिनिव्हात निर्माण होणार्या ब्लॅक होलचा. टेक्सॉस (अमेरिका) विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे अभ्यास अल्बर्ट ए. जॅक्सन व मायकल पी. रायल ज्युनियर यांनी एक संशोधन मांडले आहे. यासंदर्भात त्यांनी मांडलेले संशोधन अधिक विश्वासार्ह मानले जाते. त्यांच्या म्हणण्यानुसार ब्लॅक होलच्या निर्मितीमुळे ही परिस्थिती उत्पन्न झाली आहे. (ब्लॅक होल अर्थात कृष्णविवर म्हणजे अवकाशातील पोकळ अवस्था) पण हे कसे घडले हे दोन्ही शास्त्रज्ञ सिद्ध करू शकले नाहीत.
आता धोका जास्त
त्यांच्या मते ब्लॅक होल निर्माण झाल्यास सायबेरीयात झालेल्या नुकसानीपेक्षा मोठा धोका आहे. अंतराळात धुळीच्या कणाच्या आकाराइतके ब्लॅक होल्स आहेत. सृष्टीच्या उत्पत्तीवेळी झालेल्या महास्फोटातून त्यांची निर्मिती झाली आहे. या महास्फोटानंतर म्हणजे १० ते १५ अब्ज वर्षांपूर्वी सृष्टीची निर्मिती झाली.
जॅक्सन व रायन यांच्या मते अडीच हजार मैल प्रतितास या वेगाने एखादी वस्तू पृथ्वीच्या परिघात आल्यास सायबेरीयात झालेल्या विध्वंसापेक्षा मोठा विध्वंस होऊ श कतो. यातून निघणारी उर्जा दहा मेगाटन हायड्रोजन बॉम्बपेक्षा भयानक असू शकते.
या सार्या पार्श्वभूमीवर दहा सप्टेंबरला फ्रान्स व स्वित्झर्लंड यांच्या सीमेवर जमिनीखाली शंभराहून जास्त मीटरवर लार्ज हेड्रान कोलायजरची (एलएचसी) प्रक्रिया सुरू केली जामार आहे. एलएचसी नावाचे हे यंत्र या प्रयोगासाठी ठेवण्यात आले आहे. जगातील हे सर्वांत मोठे त्वरक (पार्टिकल एक्सलेटर) आहे. याच्या माध्यमातून प्रोटॉनचे विखंडन केले जाणार आहे.
या माध्यमातून बिग बॅंग अर्थात महाविस्फोटवेळी तयार झालेली परिस्थिती निर्माण करण्याचा शास्त्रज्ञांचा इरादा आहे. या प्रकल्पावर गेल्या १४ वर्षांपासून काम सुरू होते. त्यासाठी आठ अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत. पण शास्त्रज्ञांच्या एका गटाच्या मते हा प्रयोग पृथ्वीसाठी घातक ठरू शकतो. त्यांच्या मते या प्रयोगामुळे ब्लॅक होल निर्माण होऊन पृथ्वीलाही ते गिळून टाकतील.
| |
घाबरायचे काम नाही
त्याचवेळी विख्यात शास्त्रज्ञ जेम्स गिलीस यांच्या मते पृथ्वीच्या जवळपास आंतराळातील किरणे आहेत. त्यातून सहजरित्या ब्लॅक होल उत्पन्न होऊ शकतात. पण असे अजूनपर्यंत झालेले नाही. पृथ्वी सुरक्षित आहे. त्यामुळे या प्रयोगातून काहीही नुकसान होणार नाही.
यासंदर्भात विविध नियतकालिके, वर्तमानपत्रांत लेख प्रसिद्ध करून याविषयीच्या शंकाकुशंका दूर करण्याचे काम सुरू आहे. या प्रयोगामुळे पृथ्वी संकटात सापडली असती तर त्यासाठी करोडो रूपये खर्च केलेच गेले नसते. त्याचवेळी लोकांची भीती दूर करण्यासाठी हा प्रयोग काही काळासाठी पुढे ढकलला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हा प्रयोग करू नये यासाठी काही शास्त्रज्ञांना धमक्याही मिळाल्या आहेत.
लोक चक्क रडताहेत...
युरोपीय शास्त्रज्ञ संस्थेचे जनसंपर्क विभाग प्रमुख जेम्स गिलीस यांनी सांगितले, की लोक त्यांना फोन करून आपली भीती व्यक्त करत आहेत. रडत रडत ते हा प्रयोग करू नये यासाठी मनधरणी करत आहेत. आपण सुरक्षित राहू ना? आपली मुले-बायको यांना धोका तर नाही ना? असे प्रश्न ते विचारत असल्याचे त्यांनी सांगितले.
एलएचसी यंत्राचे काम कसे चालेल?
|
हे सर्किट जगातील सर्वांत शक्तीशाली अणू विखंडक आहे. ३.५ अब्ज पाऊंड लार्ज हेड्रान कोलायजरच्या (एलएचसी) क्षमतेने काम करते. त्याला बनविण्यासाठी ८५ देशांच्या हजाराहून अधिक शास्त्रज्ञ भिडले होते.
हे मशीन प्रोटोनच्या दोन स्ट्रीमला प्रकाशाच्या गतीच्या 99.9999991 पटीने गती देईल. त्यामुळे एक स्ट्रीम एका सेकंदात 11244517 अंतर कापेल. चौथ्या बिंदूवर या दोन स्ट्रीम परस्परांशी धडकतील. ११ नोट्सची दोन विमानांची आकाशात टक्कर होण्यासारखी ही परिस्थिती असेल. आत लावलेले डिटेक्टर परिस्थितीचा अभ्यास करून डेटा उपलब्ध करून देतील.
बिग बॅंग अर्थात महाविस्फोटावेळी काय स्थिती होती, हे या प्रयोगाच्या माध्यमातून शास्त्रज्ञांना कळू शकेल. अपेक्षित ते साध्य झाले नाही तरीही या प्रयोगातून बरेच काही कळू शकेल, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे.
