मंथन | बाबा आमटे | मराठी दिन | गांधी जयंती | सावरकर | ब्लॉग-कॉर्नर
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » आज-काल » मंथन » गुरुमुळे राज ठाकरे असमाधानी
Feedback Print Bookmark and Share
 

raj thakare
ND
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्म सूर्योदयापूर्वी श्रावण नक्षत्रात झालेला असून या नक्षत्रात जन्मणार्‍या व्यक्ती जातीवंत, धनाढ्य आणि लोकप्रिय असतात. राज ठाकरेंजवळ हे तीनही गुण असून ते लोकप्रिय व आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. राजच्या जन्मवेळी सूर्य ज्या ठिकाणी होता त्यामुळे ते क्रोधी, तापट स्वभावाचे बनले आहे. यामुळे राज दीर्घसूत्री असून चंद्रावस्थेमुळे साहसी आणि कुणाच्याही पुढे झुकायला त्यांना आवडत नाही.

अशा व्यक्तींना युवावस्थेत भाग्योदय, राजसन्मान प्राप्त होतो. मंगळ असल्याने पराक्रमी असले तरी कौटुंबिक सुख भोगू शकत नाहीत. त्यामुळे अशा लोकांना स्वजनांचे प्रेम कमी मिळते. बुध उच्च असल्यामुळे ते बुद्धिमान आणि पराक्रमी आहेत. म्हणूनच राज एका विशिष्‍ट वर्गाचे प्रमुख आहेत.

अशा व्यक्ती बहूश्रुत आणि गुरूमुळे तन-मन-धन व वाहनाचे सुख पूर्णपणे भोगणार्‍या असतात. परंतु, या गुरूमुळेच राज असमाधानी आहेत.

  ऑक्टोबरअखेरपर्यंत राज यांचे आवश्यक कार्य अपूर्ण राहील. यादरम्यान त्यांच्या सहकार्याने मित्रमंडळींना लाभ होईल. परंतु, विरोधी पक्ष नवीन अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. जवळील लोकांशी संबंध आणखी बिघडू शकतात.      
सध्या राज यांच्या गुरूची महादशा सुरू असून तिचा कार्यकाळ 18 जानेवारी 2001 ते 18 जानेवारी 2017 पर्यंत असेल. याअंतर्गत दशा- गुरूत गुरूची 6 मार्च 2008 पर्यंत, शनीची 18 सप्टेंबर 2005 पर्यंत, बुध 24 डिसेंबर 2007 पर्यंत होती. सध्या 24 डिसेंबर 2007 पासून 30 नोव्हेंबरपर्यंत केतूची आंतरदशा सुरू आहे. यामुळेच राज यांची भडक वक्तव्ये येत आहेत. या काळात माणूस भावनाशीलही होतो. शिवसेनाप्रमुखांबद्दल त्यांनी केलेली वक्तव्ये याचाच भाग आहेत.

30 ‍नोव्हेंबर 2008 ते 30 जुलै 2011 पर्यंत शुक्राची आंतरदशा असेल. त्यानंतर सूर्याची 18 मे 2012 पर्यंत, चंद्राची 18 सप्टेंबर 2013 पर्यंत, मंगळाची 24 ऑगस्ट 2014 पर्यंत आणि राहूची 18 जानेवारी 2017 पर्यंत आंतरदशा राहील. यानंतर शनीची महादशा एकोणीस वर्षांपर्यंत राहील. सध्या त्यांचे नशीब त्यांना प्रत्येक कार्यात साथ देत असून कुंडलीत शनी विराजमान असल्यामुळे धन आणि सुख प्राप्त होण्याचा योग आहे.

ऑक्टोबरअखेरपर्यंत राज यांचे आवश्यक कार्य अपूर्ण राहील. यादरम्यान त्यांच्या सहकार्याने मित्रमंडळींना लाभ होईल. परंतु, विरोधी पक्ष नवीन अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. जवळील लोकांशी संबंध आणखी बिघडू शकतात. ऑक्टोबरअखेर ते नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत राज यांना नशीबाची साथ असेल. आपल्या कार्यात यशस्वी झाल्यामुळे ते प्रसन्न राहतील.

त्यांनी ठरविलेले कार्य डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होईल. परंतु, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जानेवारी अखेरपर्यंत राज यांना संयम पाळावा लागणार आहे. अन्यथा, कडक टीका होण्याची शक्यता आहे. तसेच, फेब्रुवारीत एखाद्या अप्रिय घटनेची शक्यता असून यामुळे संकट ओढवू शकते. त्यांच्या मनात देव, गुरू, ब्राह्मणांप्रती भावना जागृत होईल. हरवलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होईल. राज यांनी नीलम, हिरा आणि पन्नाचे संयुक्त लॉकेट गळ्यात घालणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरूवारचा दिवस चांगला असेल. गुलाबी, हिरवा, पांढरा रंग आपल्यासाठी शुभ रंग आहे.
संबंधित माहिती शोधा