1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन

विकासाचा विजय, दहशतवादाचा पराभव

- आलोक मेहता

NDND
राजकीय तज्ज्ञांचे अंदाज पुन्हा एकदा चुकीचे सिध्द झाले आहेत. मुंबईतील अतिरेकी हल्ल्याचे पडसाद मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, मिझोराम आणि छत्तीसगडच्या मतदानात दिसलेच नाहीत. युवक, महिला, दलित किंवा अल्पसंख्याक मतदारांनी निवडणुकीत विचारपूर्वक पक्ष आणि उमेदवारांनी मतदान केले आहे. यामुळेच इंग्रजांच्या थाटात पाच वर्ष राज्य करणार्‍या महाराणी वसुंधरा राजेंच्या 'राजेशाही'ला मतदारांनी स्पष्टपणे नाकारले. राजस्थानातील महिला मतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदान करुन सरकार बदलले. दुसरीकडे पाच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतरही सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे काम करणार्‍या अशोक गहलोत यांचा विजय महत्त्वाचा ठरावा.

छत्तीसगडमध्येही दहशतवादाचे सावट होतेच. नक्षलवादी हिंसा, कॉंग्रेसमधील एका गुन्हेगारी गटाची दहशत या निवडणुकीतही प्रभाव टाकणारी ठरली. पण सामान्य जनता अमेरिकेतील असो की छत्तीसगडमधील, ती शांतता आणि विकासालाच महत्व देते. याचा अनुभव येथील निवडणुकीत आला. भाजपचे रमणसिंह यांनी पक्षातील गटबाजी आणि गंभीर सामाजिक आर्थिक आव्हानांसमोर विकासाला महत्व दिले. त्याचा फायदा पक्षाला निवडणुकीत झाला.

मध्य प्रदेश काँग्रेसमधील काही नेत्यांनी दबाव आणि गटतटाचे राजकारण केले. दुसरीकडे अनुनभवी असणार्‍या शिवराजसिंह चौहान यांनी विकासालाच महत्व दिले. जनतेनेही त्याच जोरावर मतदान केले. मुंबईतील अतिरेकी घटनेमुळे दिल्लीही हादरली होती. यामुळे राजकीय तज्ज्ञ, माध्यमे याचा फटका कॉंग्रेसला बसून भाजपला फायदा होईल असे भाकित वर्तवत होते. पण मतदारांनी काँग्रेसपेक्षा शीला दीक्षित आणि त्यांच्या सरकारच्या कामाला महत्व दिले.

मिझोराममध्ये वर्षांनुवर्ष हिंसा आणि दहशतवादाचा प्रभाव राहिला आहे. तेथील प्रादेशिक पक्ष असलेल्या एमएनएफने सलग दहा वर्षे एकछत्री राज्य केले. परंतु, मतदारांनी हिमतीने आणि धैर्याने काँग्रेसला मतदान करून मोठे बहुमत दिले. जगातील लोकशाही राष्ट्रांमध्ये या प्रकारची परिस्थिती आणि राजकीय विचारधारा कुठेही नाही. स्वतंत्र लोकशाही आणि विकासाची अपेक्षा करणार्‍यांचा हा विजय आहे.