| प्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे, की जन्मजात जातिभेदामध्ये जे काय आपणांस राष्ट्रीयदृष्ट्या अनिष्टतम असल्याने मुख्यत: उच्छेदावयाचे आहे ते आजच्या जातीतील जन्मजातपणाची नुसती उपपत्ति वा भावना ही नसून तिच्याशी घातलेली मानवी उच्चनीचतेची आणि विशिष्टाधिकारांची सांगड ही होय. अमुक मनुष्य ब्राह्मणकुलात जन्माला, म्हणूनच केवळ, त्याच्यात तसा विशेष गुण नसूनही, त्यास अग्रपूजेचा, वेदोक्ताचा, पूर्वीच्या निर्बंधानुसार.... |