मोबाइल क्रमांक न बदलता मोबाइल कंपनी बदलने अर्थात मोबाइल नंबर पोर्टेबलिटी (एमएनपी) ग्राहकांचे हे स्वप्न अवघ्या 19 रूपयात पूर्ण होणार आहे. दूरसंचार निगम प्राधिकरणने (ट्राई) काल, शुक्रवारी एमएनपीचे दर निश्चित केले आहेत.
एमएनपी सुविधा 31 डिसेंबरपासून महानगर व 'अ' श्रेणी सेवा क्षेत्रातील ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे तर देशातील इतर भागात ही सुविधा 20 मार्च 2010 पर्यंत उपलब्ध करून दिली जाईल.
ही सुविधा फारच महागडी असेल, अशी मोबाइल ग्राहकांमध्ये चर्चा होती. मात्र ही सुविधा घेण्यासाठी मोबाइल ग्राहकाला रू. 19 एवढा नाममात्र शुल्क लागणार आहे.