मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वार्ता|

अमेरिका: नेवार्क विमानतळावरील सुरक्षा भेदली

अमेरिकेच्‍या न्यूयॉर्कजवळील नेवार्क विमानतळाच्‍या के. सी. टर्मिनलमध्‍ये एक व्यक्ती कुठल्‍याही परवानगी शिवाय सुरक्षा यंत्रणा भेदून घुसल्‍याची माहिती समोर आली आहे. सुरक्षेत झालेल्‍या चुकीनंतर हे टर्मिल बंद करून प्रवाशांची तपासणी केली जात आहे.

अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनने विमानतळ सुरक्षा प्रशासनाच्‍या माहिती आधारे दिलेल्‍या वृत्तानुसार एक व्यक्ती केंद्राच्‍या उलट्या बाजूने कुठलीही सुरक्षा तपासणी न करता टर्मिनल 'सी'मध्‍ये घुसला सुरक्षा अधिका-यांना ही माहिती मिळताच त्यांनी टर्मिनल रिकामा केला असून आत असलेल्‍या सर्व प्रवाशांची तपासणी सुरू केली आहे.

टर्मिनलमध्‍ये सध्‍या दोन ते तीन हजार प्रवासी आहेत.