अणू करारप्रश्नी आंतरराष्ट्रीय अणू उर्जा समितीकडे (आयएईए)जाणारच या पंतप्रधानांच्या विधानानंतर सरकारचा पाठिंबा डाव्यांनी काढून घेतला असला तरी पंतप्रधान मनमोहनसिंग मात्र सरकारला कोणताही धोका नाही, असे म्हणत आहेत.
जी-८ परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान जपानला आले आहेत. तेथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकार कोसळणार नाही, असा विश्वास व्यक्त केला, त्याचबरोबर आयएईएकडे जाणार असल्याचे सांगितले.
आयएईएकडे जाण्यासंदर्भात पंतप्रधानांनी केलेल्या विधानानंतर चिडलेल्या डाव्यांनी लगोलग दुसर्या दिवशी सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला. समाजवादी पक्षाचा पाठिंबा मिळाल्याने पंतप्रधानही आत्मविश्वासात असल्याचे दिसत आहे.
|