1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|

चीनने काश्मीरमधील 'उद्योग' थांबवावेत- भारत

ND
ND
अरूणाचल प्रदेशच्या मुद्यावर भारत आणि चीन या उभय देशांत संबंध ताणले गेलेले असतानाच आता भारताने चीनच्या पाकव्याप्त काश्मीरमधील हस्तक्षेपाचा मुद्दा पुढे आणला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा आमचाच पाकिस्तानने बळकावलेला भाग असून चीनने तिथे चालविलेले 'उद्योग' थांबवावेत, असे भारताने म्हटले आहे.

पाकतर्फे चीनच्या सहकार्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये काही प्रकल्प चालविले जात आहेत. या विषयी विचारले असता सरकारच्या प्रवक्त्याने सरकारची भूमिका स्पष्ट केली. चीनची सरकारी न्यूज एजन्सी क्झिहुआने दिलेले चिनी राष्ट्राध्यक्षांच्या हवाल्याने पाकव्याप्त काश्मीरमधील प्रकल्प सुरूच ठेवणार असल्याचे वृत्त आमच्यापर्यंत पोहोचले आहे. यासंदर्भात चीन भारताशी असलेल्या दीर्घकालीन संबंधांचा आढावा घेऊन पाकव्याप्त काश्मीरमधील बेकायदा काम थांबवेल अशी आशा भारताला असल्याचे या प्रवक्त्याने सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनचे संबंध अरूणाचल प्रदेशच्या मालकी हक्कावरून बिघडले आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अरूणाचल भेटीवरही चीनने आक्षेप नोंदवला होता. त्यावर अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे भारताने काल स्पष्ट केले होते.

चिनी सैन्याची जमवाजमव नाही