Mahatma`s ration card names Godse as his father | नाव- एम. के. गांधी. वडिल- गोडसे!
भारतात काहीही होऊ शकतं, याचा आणखी एक पुरावा सापडला आहे. आंध्र प्रदेशात दिवंगत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावे रेशनकार्ड काढण्यात आले आहे. यावर कडी म्हणजे त्यावर महात्माजींच्या वडिलांचे नाव म्हणून त्यांचाच मारेकरी नथूराम गोडसेचे नाव आहे.
बोगस कार्ड शोधण्याच्या मोहिमेतच हे कार्ड सापले हे विशेष. चित्तूर जिल्ह्यातील चुत्तगुंटा गावात हे कार्ड देण्यात आले आहे. त्यावर एम. के. गांधी असे नाव असून वय ६५, आणि वडिलांचे नाव गोडसे असे लिहिल्याचे सापडले आहे. पत्ता गांधी रोड, असा असून तो एका स्वस्त धान्य दुकानदाराचा आहे. या कार्डावर कार्डधारक म्हणून महात्मा गांधींचा फोटोही आहे.
जिल्हाधिकारी शेषाद्री यांनी या घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नेमली आहे. अर्थात, बोगस कार्ड सापडण्याचा पहिला प्रसंग नाही. यापूर्वीही चित्रपट तारे, देवदेवता, खेळाडू यांच्या नावे अशी कार्ड काढल्याचे आढळले आहे.