एस.टी.कडून पोलीस कल्याण निधीस मदत
अवैध प्रवासी वाहतुकीला प्रतिबंध करून महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी योगदान दिल्याबद्दल काही पोलीस अधिकार्याचा उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांच्याहस्ते पोलीस कल्याण निधीसाठी २० लाख ११ हजार रूपयांचा धनादेश उपमुंख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
एस.टी. महामंडळाने अवैध प्रवासी वाहतुकीला प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांकरिता एप्रिल २००६ ते मार्च २००७ या कालावधीत आर्थिक प्रोत्साहन योजना राबवली. या योजनेत नागपूर, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यातील पोलीस अधिकार्यांनी भरीव योगदान दिले. या अधिकार्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यात नागपूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त एस.पी. यादव आणि नागपूर पोलीस अधीक्षक यशस्त्री यादव, अमरावतीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यादव आणि अकोल्याचे पोलीस अधीक्षक शांताराम वाघमारे यांचा समावेश आहे.
या समारंभास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश गुप्ता, पोलीस महासंचालक डॉ. पी.एस.पसरिचा तसेच पोलीस व एस.टी.चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.