शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 फेब्रुवारी 2024 (13:29 IST)

मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

Manoj Jarange Patil
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करत उपोषण करणारे मनोज जरांगे पाटीलांच्या मागण्या राज्य सरकार ने ऐकल्या आणि सगेसोयरे अध्यादेश पारित करण्यात आला.येत्या 10 तारखे पासून मराठा आरक्षण कायदा पारित व्हावा आणि आरक्षण लागू व्हावे या साठी ते आक्रमक झाले असून ते पुन्हा  आमरण उपोषण करणार आहे. 

आज पासून मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहे. आळंदीत त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीनंतर जरांगे हे माउलींच दर्शन घेणार आहे. मनोज यांचा दौरा मुंबई, पुणे, नाशिक  असा असणार आहे. ते आंतरवली सराटी येथून निघतील आणि आळंदी या ठिकाणी मुक्काम करतील. 
त्यांचा 7 फेब्रुवारी रोजी नवी मुंबईतील कामोठे मध्ये सकाळचा कार्यक्रम आहे. तर संध्याकाळी दादरच्या शिवाजी मंदिरात कार्यक्रमाला उपस्थिती लावणार. 

त्या नंतर त्यांचा 8 फेब्रुवारी रोजी दौरा सटाण्यात दौरा आहे. 
तर 9 फेब्रुवारी रोजी बीडमध्ये मनोज जरांगे यांचा दौरा आहे. 
येत्या 10 फेब्रुवारी रोजी अंतरवाली सराटी येथे  मराठा बांधवांची बैठक घेऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार. 
 
Edited by - Priya Dixit