1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (18:30 IST)

नवाब मलिक पीएमएलए कोर्टात हजर, ईडीने 14 दिवसांची कोठडी मागितली

Nawab Malik appears in PMLA court
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. आठ तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. तपास यंत्रणेने दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात त्यांच्या घरावरपहाटे छापा टाकला आणि  ईडीने त्यांना चौकशीसाठी नेले. सुमारे सहा तास चाललेल्या चौकशीनंतर त्यांना  अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 
 
ईडीने नवाब मलिक यांना पीएमएलए कोर्टात हजर केले. यादरम्यान नवाब मलिक यांनी पीएमएलए कोर्टात सांगितले की, सकाळी ईडीचे अधिकारी माझ्या घरी आले, मला ईडी कार्यालयात घेऊन गेले. मला ताब्यात घेण्यात आले आणि नंतर माझे म्हणणे नोंदवले. त्यांनी मला ईडी कार्यालयात समन्सची प्रत दिली आणि त्यावर सही करण्यास सांगितले.

ईडी ने मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे