1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 20 नोव्हेंबर 2022 (13:35 IST)

राज्यात थंडीचा कडाका वाढला, सर्वत्र धुक्याची चादर पसरली

The state became colder
यंदाच्या मोसमात राज्यभरात चांगल्याच पावसाची नोंद झाल्याने येणार्‍या काही महिन्यात पार अजून खाली जाण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, नाशिक आणि लगतच्या भागामध्ये येत्या दोन ते तीन दिवसांममध्ये तापमानाचा पारा घसरू शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी वाढू लागली आहे. उत्तरेकडील वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यातही थंडी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या धुक्याची चादर पसरली आहे. 
 
राज्यात थंडी वाढली असून शुक्रवारी निफाडचा पारा 8.5 अंश तर नाशिकचा पारा 11.2 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली. पुणे, सातारा,नाशिकसह राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान घसरले.महाबळेश्वरात तापमान १०.४ अंशांवर पोहोचले.तर वेण्णालेक ६ अंशांवर घसरले. पुण्यात थंडीचा जोर वाढला असून कानटोप्या स्वेटर्सला मागण्या वाढल्या आहे. साताऱ्याचे तापमान 11 अंशावर आले आहे. शेतकरी रब्बीच्या पिकासाठी ही थंडी पोषक असल्याने आनंदात आहे. 
 
नाशिकचे तपामन तीन दिवसांत 13 अंश सेल्सिअस वरून 11.2 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली.निफाडचा पारा 8.5 अंश नोंदला गेला. 

राज्यात थंडीचा कडाका वाढल्यामुळे दररोज सकाळी वॉक ला जाणाऱ्यांची गर्दी दिसत नसल्यामुळे रस्त्यावर सामसूम आहे. लोक थंडीचा बचाव करण्यासाठी शेकोटीचा आनंद घेत आहे. 
 
Edited by - Priya Dixit