तोंडाद्वारे मुतखडा काढणारी आजी
|
फोटोगॅलरी बघण्यासाठी येथे क्लिक करा
तेथे असलेल्या दुर्गादेवीच्या मंदिरासमोरील ओट्यावर एका वृद्ध महिलेभोवती जमावाचा वेढा होता. जवळ जाताच समजले की याच त्या मुतखडा काढणार्या सीताबाई. ही गर्दी होती उपचारासाठी आलेल्या रूग्णांची. सीताबाईंचे काम चालूच होते. त्या एकेकाला खाली झोपवून नेमके कुठे दुखतेय? असे विचारत होत्या. मग दुखत असलेल्या जागेला तोंडात घेत व आंब्यासारखे चोखायला सुरवात करत आणि दुसर्याच क्षणी समोरच्या मुलाकडे खडा काढून देत. हे चक्र बराचवेळ चालू होते. सीताबाईंना थोडासा वेळ मिळाल्याची संधी आम्ही साधली.
|
प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर सीताबाईं काहीशा चिडल्या. त्यात स्वरात त्यांनी बोलायला सुरवात केली. त्या म्हणाल्या, गेल्या अठरा वर्षांपासून मुतखडा काढण्याचे काम मी निरंतर करते आहे. मी हवा आहे. माझी ५२ स्थाने असून प्रत्येक जागेवर मी वेगवेगळी कामे करते. इलाजाचा खरा मंत्र देवीवरील विश्वास आहे.
विश्वास पक्का असेल तर त्रासातून सुटका नक्की होते. मात्र विश्वास नसेल तर सगळे काही व्यर्थ आहे.हे सांगून त्या पुन्हा रूग्णांच्या उपचारात गुंतल्या. एका बाजूला सीताबाईंचे मुतखडा काढण्याचे काम वेगात सुरू होते तर दुसरीकडे पंडाराम नामक व्यक्ती रूग्णांना पालक, टोमॅटो, वांगे न खाण्याची सूचना देत होती. तसेच औषधाच्या रूपात दिले जाणारे तुळस व बेलाच्या पानांचे चूर्ण तीन दिवस सायंकाळी खाण्यास सांगितले जात होते.
|
औषध व शस्त्रक्रियेविना मुतखडा बरा करण्याचा दावा करणे ही आपले मत नोंदवा
|
आम्ही लोकांशी बोलण्यात मग्न होतो, तर तिकडे सीताबाई मुतखडा काढण्यात गर्क होत्या. आमची चर्चा संपल्यानंतर आम्ही सीताबाईंची वाट पाहू लागलो. परंतु, थोड्यावेळापूर्वी आमच्यावर खेकसणार्या सीताबाईंमध्ये अचानक बदल झाला आणि त्या खेड्यातील एखाद्या आजीबाईंसारख्या बोलायला लागल्या.
| |
|
आम्ही त्यांना तुम्ही हे सर्व केव्हापासून करत आहात, असे विचारले असता त्यांनी चमत्कारिक उत्तर दिले, मी कुठे काय करतेय? जे काही करते ते देवी माँ. मी कसा उपचार करते हे तर मलाच माहीत नाही. दैवी शक्ती माझ्याकडून हे सर्व करून घेते.' एवढे सांगून त्या धान्य निवडायला बसल्या.
येथे उपचार केलेल्या लोकांचा दावा आहे की त्याचा मुतखडा पूर्णपणे निघून गेला आहे. परंतु, यावर डॉक्टरांचा विश्वास नाही. यासंदर्भात आम्ही जनरल सर्जन चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की मुतखडा जर बारीक असेल तर तो लघवीच्या माध्यमातून निघून जाईल. अन्यथा पूर्ण वैद्यकीय उपचारच याला दूर करू शकतो. तोंडाने मुतखड्याचा खडा काढणे अशक्य आहे. आधीच तोंडात खडा ठेवून नंतर तोंडातून मुतखडा काढण्याचा दावा करता येईल.
|
फोटोगॅलरी बघण्यासाठी येथे टिचकी मारा.
वाचा दर मंगळवारी एक नवी कथा
