सोम पुष्य नक्षत्र...शुभ मुहूर्त!
- ज्यो. डॉ. रामकृष्ण तिवारी
WD
सोमवार सूर्योदयाच्या आधीपासून दिवस संपेपर्यंत खरेदीचा शुभ योग असून आज आपल्या कुळ परंपरेनुसार वार्षिक व्यवहारासाठी वही, पेन तसेच इतर सामग्री खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त आहे. आजच्या दिवशी दान करणेही श्रेष्ठ मानले जाते. या शुभकाळात चांगले कर्म केल्याने शुभफळ हे निश्चित मिळत असते.
शुभ मुहूर्त -
सकाळी 6.02 ते 7.50 हा काळ अमृत मुहूर्ताचा काळ असून घरातून बाहेर निघताना दही सेवन केले पाहिजे.
सकाळी 9.18 ते 10.45 या वेळेत शुभ मुहूर्त आहे. देवाची आराधना करून चांगले कर्म केले पाहिजे.
दुपारी 1.40 ते 3.07 याकाळात शुभ कार्य करण्यासाठी निघण्यापूर्वी देवासमोर अगरबत्ती लावली पाहिजे.
दुपारी 3.07 ते 4.34 या वेळेत गूळ व धणे खावेत.
संध्या 4.34 ते 6.02 वेळेत देवाला वाहिलेले फूल आपल्या जवळ ठेवावे.
संध्या 6.02 ते 7.35 वेळेत अंगावरील कपड्यांना अत्तर लावून घराबाहेर निघावे.
सकाळी 9.03 ते 11.18 वेळेत बाजारात खरेदी करण्यासाठी निघण्यापूर्वी लाल रंगाचे कपडे परिधान करावे अथवा लाल रूमाल खिशात ठेवावा. तसेच चंदनाचा गंध आपल्या कपाळावर लावावा.
दुपारी 3.10 ते 4.44 पर्यंत कुंभ लग्न काळ आहे. यावेळे दरम्यान खरेदीसाठी जाण्यापूर्वी कलश दर्शन करणे शुभ फलदायी आहे.
रात्री 7.55 ते 9.33 वेळे दरम्यान वृषभ लग्न काळ आहे. यावेळेत पांढर्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवाला पांढरे फूल व तांदूळ अर्पण करावेत. अशा पध्दतीने सोमपुष्य नक्षत्राचा लाभ घेतला पाहिजे.
