शबरीमाला मंदिरात प्रतिष्ठापित भगवान अय्यप्पा यांनी पृथ्वीतलावर मानवाच्या स्वरूपात जन्म घेतला घेतला होता, असे मानले जाते. त्यांचा जन्म कुणाच्या घरी झाला हे अज्ञात आहे. पण राजा पंडालम यांच्या घरीच त्यांचे पालन-पोषण झाले. राजा पंडालम यांनी अचिनकोविल नदीच्या उगमस्थानी बांधलेले मंदिर कोयीक्कल नावाने प्रसिद्ध आहे.
राजा पंडालम यांनी मानलेल्या मुलाच्या स्मृतीसाठी या व शबरीमला मंदिराची निर्मिती केली होती. भगवान अय्यप्पांनी तारूण्यातील कालावधी पंडालम येथे घालवल्यामुळे या मंदिराचे विशेष महात्म्य आहे. शबरीमलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक अगोदर कोयीक्कल मंदिरात दर्शनासाठी येतात. शबरीमला मंदिरात असलेल्या भगवान अय्यप्पांच्या मूर्तीस मकराविलकूच्या दिवशी पंडालम महालातून आणलेले दागिणे घालण्यात येतात. मकराविलकू महोत्सव सुमारे दोन महिन्यांपर्यंत चालतो. या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी हे दागिने ठेवण्यात येतात. शोभायात्रा काढून पंडालम येथून शबरीमला येथे हे दागिने नेण्यात येतात. आकाशात उडणार्या गरूडाचे दर्शन झाल्यानंतरच शोभायात्रेस सुरूवात होते. प्रत्येकवर्षी शोभायात्रेअगोदर गरूडाचे दर्शन होते.
भगवान अय्यप्पांमुळेच हा चमत्कार शक्य असल्याचे मानण्यात येते. दागिने पंडालम येथून शबरीमलास नेण्यार्या शोभायात्रेच्या संरक्षणाची जबाबदारी पंडालमच्या राजघराण्याची आहे. राजघराण्यातील सदस्य यात सहभागी होतात. यावर्षी बारा जानेवारीस ही शोभायात्रा काढण्यात येईल.
पौराणिक कथा : प्रभू अय्यप्पांबाबत अनेक कथा आहेत. अय्यप्पांनी मानवाच्या रूपात पंडालमच्या राजाच्या घरी जन्म घेतल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यावेळी राजशेखर हे पंडालमचे राजे होते. एकेवेळी भगवान अय्य्प्पांची बालकाच्या रूपात राजा राजशेखर यांच्याशी गाठ पडली होती.
|