1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख

प्रभू अय्यप्पांचे कोयीक्कल मंदिर

प्रभु अयप्पाच्या स्मृतीचे अद्धभूत पूजास्थळ

WDWD
शबरीमाला मंदिरात प्रतिष्ठापित भगवान अय्यप्पा यांनी पृथ्वीतलावर मानवाच्या स्वरूपात जन्म घेतला घेतला होता, असे मानले जाते. त्यांचा जन्म कुणाच्या घरी झाला हे अज्ञात आहे. पण राजा पंडालम यांच्या घरीच त्यांचे पालन-पोषण झाले. राजा पंडालम यांनी अचिनकोविल नदीच्या उगमस्थानी बांधलेले मंदिर कोयीक्कल नावाने प्रसिद्ध आहे.

राजा पंडालम यांनी मानलेल्या मुलाच्या स्मृतीसाठी या व शबरीमला मंदिराची निर्मिती केली होती. भगवान अय्यप्पांनी तारूण्यातील कालावधी पंडालम येथे घालवल्यामुळे या मंदिराचे विशेष महात्म्य आहे. शबरीमलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक अगोदर कोयीक्कल मंदिरात दर्शनासाठी येतात. शबरीमला मंदिरात असलेल्या भगवान अय्यप्पांच्या मूर्तीस मकराविलकूच्या दिवशी पंडालम महालातून आणलेले दागिणे घालण्यात येतात. मकराविलकू
WDWD
महोत्सव सुमारे दोन महिन्यांपर्यंत चालतो. या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी हे दागिने ठेवण्यात येतात. शोभायात्रा काढून पंडालम येथून शबरीमला येथे हे दागिने नेण्यात येतात. आकाशात उडणार्‍या गरूडाचे दर्शन झाल्यानंतरच शोभायात्रेस सुरूवात होते. प्रत्येकवर्षी शोभायात्रेअगोदर गरूडाचे दर्शन होते.

भगवान अय्यप्पांमुळेच हा चमत्कार शक्य असल्याचे मानण्यात येते. दागिने पंडालम येथून शबरीमलास नेण्यार्‍या शोभायात्रेच्या संरक्षणाची जबाबदारी पंडालमच्या राजघराण्याची आहे. राजघराण्यातील सदस्य यात सहभागी होतात. यावर्षी बारा जानेवारीस ही शोभायात्रा काढण्यात येईल.

WDWD
पौराणिक कथा :
प्रभू अय्यप्पांबाबत अनेक कथा आहेत. अय्यप्पांनी मानवाच्या रूपात पंडालमच्या राजाच्या घरी जन्म घेतल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यावेळी राजशेखर हे पंडालमचे राजे होते. एकेवेळी भगवान अय्य्प्पांची बालकाच्या रूपात राजा राजशेखर यांच्याशी गाठ पडली होती.

WDWD
या बालकाच्या गळ्यात माळ होती. राजे राजशेखर भाविक वृत्तीचे होते. निपुत्रिक होते. त्यांनी बालकास परमेश्वराचे वरदान समजून मुलगा मानले. त्यांनी त्याचे नाव मणीकंठ ठेवले. त्याला उच्च दर्जाचे शिक्षण दिले. तो राज्याचा उत्तराधिकारी बनला. काही कालावधीनंतर राजशेखर यांच्या पत्नीने एका सुंदर बालकास जन्म दिला.

महाराणीचे सेवक व मंत्र्यांनी मणीकंठामुळे तिच्या स्वतःच्या पुत्रास राजगादीपासून वंचित रहावे लागेल, असे तिच्या कानात भरविले. मणिकंठास राजगादीपासून दूर करण्यासाठी राणीने कारस्थान रचले. राजवैद्यास फितवून मणिकंठास त्याच्या आईचे प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात आले. तिच्या जिवाच्या रक्षणासाठी चित्त्याचे दूध आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

आईचा जीव वाचवण्यासाठी मणिकंठाने चित्त्याचे दूध आणले. पण लवकरच आपल्याविरूद्ध कारस्थान केल्याचे त्याच्या लक्षात आले. मणिकंठ सामान्य युवक नसून त्याच्याकडे दैवी शक्ती असल्याचे यावेळी सर्वांना समजले. मणिकंठाने राजमहल सोडण्याचा निर्णय घेतला. राज्यासही कारस्थानाची माहिती झाली. त्याने मणिकंठास न जाण्याची विनंती केली.

WDWD
मणिकंठाने आपल्या वडिलांना आपण कायम त्यांचा मुलगाच रहाणार असल्याचे सांगून त्यांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले. राजास मोक्षाचा मार्ग दाखवताना पंपा नदीच्या किनारी एक मंदिर बांधण्याची विनंती केली. येथे भक्तास मणिकंठ म्हणजेच भगवान अय्यप्पांचे दर्शन प्राप्त होते. यानंतर हे मंदिर शबरीमला नावांने प्रसिद्ध झाले. मकरविलक शबरीमला मंदिराचा अंतिम बिंदू आहे. प्रत्येक वर्षी चौदा जानेवारीस हा महोत्सव साजरा करण्यात येतो. यादिवशी प्रभू अय्य्प्पास पंडालम येथून आणलेल्या ‍दागिन्यांनी सजवण्यात येते.

जाण्याचा मार्ग : येथे पोहचण्यासाठी प्रथम पंडालम गाठावे लागेल. येथून सुमारे एक किलोमीटरवर हे मंदिर आहे. विमानाने जायचे झाल्यास थिरूवनंतपुरम हे येथील जवळचे विमानतळ आहे. येथे रेल्वेनेही पोहचता येते. चिनगनूर हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा