Navratri Pooja, Navratri Festival, About Navratri In Marathi | तिरूचनूरची पद्मावती देवी
|
मंदिराचा इतिहास
|
बाराव्या शतकात यादव राजांनी येथे कृष्ण-बलरामाचे सुंदर मंदिर बांधले. त्यामुळे या मंदिराला महत्त्व प्राप्त झाले. त्यानंतर येथे सोळाव्या आणि सतराव्या शतकात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. सुंदरा वरदराजाची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि देवी पद्मावतीसाठी वेगळे मंदिर बांधण्यात आले. पौराणिक कथेनुसार देवी पद्मावतींचा जन्म कमळाच्या फुलात झालेला असल्यामुळे मंदिर तलावात बांधण्यात आले.
|
मंदिर परिसरात बर्याच देवी-देवतांची लहान-लहान मंदिरे आहेत. देवी पद्मावती व्यतिरिक्त कृष्ण-बलराम, सुंदरराजा स्वामी आणि सूर्यनारायण मंदिरेही आहेत. पण प्रभू व्यंकटेशांची पत्नी असल्यामुळे देवी पद्मावती मंदिराला जास्त महत्त्व पद्मावती देवीची मूर्ती कमळाच्या आसनावर तिच्या वरील दोन्ही हातांमध्ये कमळाचे पुष्प आहे.
कसे पोहोचाल?
मंदिर तिरूपती रेल्वे स्टेशनपासून पाच किलोमीटरवर आहे. रस्त्यालगत असलेल्या या मंदिरापर्यंत
पोहचण्यासाठी तिरूपतीहून बससेवा उपलब्ध आहे. हैदरापासून 547 किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वेमार्ग: तिरूपती हैदराबादपासून 547 किलोमीटर अंतरावर असून तेथून रेल्वेसेवादेखील उपलब्ध आहे.
हवाईमार्ग: येथे हैदराबाद, चेन्नई, बंगलोर येथून विमानाने जाता येते.
