भगवान जगन्नाथाची रथयात्रा
|
जुन्या अहमदाबादमध्ये रथोत्सवाच्या दिवशी प्रचंड उत्साहाचे वातावरण असते. जगन्नाथ मंदिरातून रथास सुरूवात होते. सुभद्रा व बलराम यांच्यासह वेगवेगळ्या तीन रथांवर भगवान जगन्नाथ संपूर्ण शहराच्या भ्रमणासाठी निघतात. यात्रेत मोठ्या संख्येने भाविक व वेगवेगळया आखडयांचे साधू-संत सहभागी होउन आपल्या कसरती करून ईश्वराबददलची आपली भक्ती सिध्द करतात.
रथोत्सवा निमित्ताने संपूर्ण शहाराचा कायापालट होऊन ठिकठिकाणी श्रद्धाळुंकडून भगवान जगन्नाथाच्या रथावर पुष्पवृष्टी केली जाते.
|
भगवान जगन्नाथाच्या मंदिराचा इतिहास हा सुमारे 443 वर्षांचा आहे. असे म्हटले जाते, की 125 वर्षांपूर्वी मंदीराचे महंत श्रीनरसिंहदासजी महाराज यांना भगवान जगन्नाथाने स्वप्नात दृष्टांत देऊन रथयात्रा सुरू करण्याचा आदेश दिला. त्या दिवसापासून ही परंपरा कायम आहे. जो भाविक मनोभावे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत सहभागी होऊन दर्शन घेतो. त्यांच्या संसाराचा रथ प्रभूच्या कृपेने सुव्यवस्थित चालतो.
|
कसे पोचाल
रस्ताः
अहमदाबाद हे गुजरात राज्यातील व्यावसायिक शहर असून राज्यातील तसेच संपूर्ण देशातील प्रमुख रस्त्यांशी जोडले आहे.
रेल्वेः
पश्चिम रेल्वेमार्गावरील अहमदाबाद हे मोठे जंक्शन असून देशभरातील प्रमुख शहरांमधून येथे पोचण्यास रेल्वेसेवा उपलब्ध आहे.
विमान सेवा
अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमान तळ असल्याने येथे पोचणे सहज शक्य आहे.
