सैलानाचे महाकेदारेश्वर मंदिर


dharma
WD
धर्मयात्रेत आज आम्ही आपल्याला भगवान शंकराच्या अर्थात महाकेदारेश्वराच्या मंदिरात घेऊन जात आहोत. मध्य प्रदेशातील रतलामपासून २५ किलोमीटरवर सैलाना नावाचे गाव आहे. येथेच महाकेदारेश्वर मंदिर आहे. येथे लांबून भक्तगण महाकेदारेश्वराचे दर्शन घ्यायला येतात. शिवाय येथील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी होत असते. उंच डोंगरांनी वेढलेले हे मंदिर अलौकीक निसर्ग सौंदर्याचेही उदाहरण आहे. पावसाळ्याच्या दिवसांत तर हे सौंदर्य आणखी खुलते.

dharma
WD
डोंगरातून निघालेले धबधबे जमिनीच्या दिशेने वेध घेऊन झेपावतात तेव्हा ते दृश्य पहाणे मोठे रमणीय असते. उंचावरून हे पाणी मंदिराच्या आतल्या भागात असलेल्या कुंडात पडते. अतिशय अवर्णनीय असा हा निसर्गानुभव आहे.

हे मंदिर जवळपास २७८ वर्ष जुने आहे. येथील शिवलिंगही नैसर्गिक आहे. येथे एकच शिवलिंग होते, असे सांगितले जाते. १७३६ मध्ये सैलानाचे महाराज जयसिंह यांनी येथे एक सुंदर मंदिर बांधले. तेच केदारेश्वर महादेव नावाने प्रसिद्ध झाले.

राजा दुलेपसिंह यांनी या मंदिराचा पुढे जीर्णोद्धार केला. मंदिराच्या जवळ असलेल्या कुडांसाठी त्यावेळी दीड लाखाचा खर्च केला. पुढे राजा जसवंतसिहांनी मंदिराच्या पुजार्‍याचा चरितार्थ चालावा यासाठी जमीन दान केली. १९९१-९२ मध्ये पुन्हा एकदा मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला.

dharma
WD

येथील पुजारी अवंतीलाल त्रिवेदी यांच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर सैलानाच्या महाराजांच्या काळापासून आहे. आता आमची चौथी पिढी या मंदिराची सेवा करते आहे. कितीही उन, वारा, पाऊस असो. देवाची पूजा कधीही चुकलेली नाही. प्रत्येक श्रावण महिन्यात येथे भाविकांची गर्दी होत असते.

याशिवाय शिवरात्र, वैशाख पौर्णिमा व कार्तिक पौर्णिमेला भाविकांची गर्दी होत असते. श्रावणात तर कावड घेऊन येणार्‍या भाविकांची मोठी गर्दी होत असते. कावडीद्वारे शंकराला जलाभिषेक केला जातो.

कसे जाल?
इंदूरहून रतलान दीडशे किलोमीटरवर आहे. तेथून सैलाना २५ किलोमीटर आहे. येथे येण्यासाठी इंदूरहून बस व टॅक्सी सेवाही आहे. इंदूरहून रेल्वेमार्गे रतलामला जाता येते.

यावर अधिक वाचा :  
Widgets Magazine

धर्मयात्रा

रामभक्त हनुमानाचे अनोखे संग्रहालय

लखनौमध्ये हनुमानासंदर्भात एक आगळे संग्रहालय उभारण्यात आले आहे. रामभक्त हनुमानसंदर्भात ...

श्री जगदंबा देवी

वेबदुनियाच्या धर्मयात्रा या भागात आम्ही आपल्याला महाराष्ट्रातील 'श्री जगदंबा देवीचे' ...

देवासची चामुंडा आणि तुळजा देवी

धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला मध्य प्रदेशातील देवासच्या टेकडीवरील प्रसिद्ध ...

तिरूचनूरची पद्मावती देवी

तिरूचनूर हे तिरूपती जवळील एक लहानसे गाव आहे. या छोट्याशा गावात देवी पद्मावतीचे सुंदर ...

Widgets Magazine

Cricket Scorecard

Widgets Magazine

सण-उत्सव

रामभक्त हनुमानाचे अनोखे संग्रहालय

-अरविंद शुक्ला,

नाशिकचे काळाराम मंदिर

दक्षिण काशी असलेल्या नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य काही काळ होते. रामचंद्रांच्या ...

नवीनतम

गुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा

जगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार! प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या प्रेषिताला ...

पंचकामध्ये कुठले शुभ कार्य वर्जित आहे

पंचकाला ज्योतिष शास्त्रात शुभ नक्षत्र मानले जात नाही. याला अशुभ आणि हानिकारक नक्षत्रांचा योग म्हणून ...

Widgets Magazine