जर्मनीने उपान्त्य फेरी गाठली

fifa jarmany
रिओ दी जानेरो| wd| Last Modified शनिवार, 5 जुलै 2014 (12:48 IST)
जर्मनीने फ्रान्सचा उपान्त्पूर्व फेरीत 1-0 असा पराभव करून शुक्रवारी सलग चौथ्यांदा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उपान्त्य फेरी गाठली आहे.

जर्मनीच्या ह्युमेल्सने 13 व मिनिटाला एकमेव गोल केला. मध्यांतरास 1-0 अशी जर्मनीने आघाडी घेतल्यानंतर फ्रान्सने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, फ्रान्सचे बेन्झेमा, ग्रिएझमान आणि वालुएन या आघाडी फळीतील खेळाडूंना जर्मनीचा बचाव भेदता आला नाही.


जर्मनीचे अनेक खेळाडू आजारी असताना आणि श्कोड्रॉन मस्तफी याने मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर त्रस्त झालेल्या जर्मनीने हा विजय मिळविला आहे.


जर्मनीने मध्यांतरानंतर अनेक वेळा जोरदार आक्रमणे केली. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. 80 व मिनिटाला फ्री किकचे रुपांतर फ्रान्सला गोलमध्ये करता आले नाही. 90 मिनिटाचा खेळ संपल्यानंतर चार मिनिटांचा अँडीशनल टाइम मिला होता. त्यापैकी 3.37 मिनिटे झाल्यानंतर फ्रान्सच्या 10 नंबर जर्सी वापरणार्‍या बेन्झेमा याचा जोरदार फटका गोलजाळर्पत पोहोचू शकला नाही. साहजिकच फ्रान्सला
पराभव मान्य करावा लागला.


13 व्या मिनिटाला जर्मनीने पहिला गोल केला. फ्री कीक
मिळल्यानंतर क्रॉस याने डी च्या बाहेरुन जोरदार फटका मारत फ्रान्सच्या
खेळाडूंना चकविले. पाच नंबर जर्सी घालणार्‍या ह्युमेल्सने अत्यंत सुरेख हेडर करीत चेंडू गोलपोस्टला लागून गोलजाळतील उजव कोपर्‍यात
धाडला. फ्रान्सचा गोलरक्षक लिओरीस याला फुटबॉल नेमका कोठे जाणार याचा अंदाजच बांधता आला नाही.


दुसर्‍याच मिनिटापासून जर्मनीने फ्रान्सच्या डी मध्ये धडक मारुन गोल करण्याचा प्रयत्न केला. जर्मनीचा गोल करण्याचा प्रयत्न फ्रान्सच्या बचावफळीने परतवून लावला. पुन्हा चौथ्या मिनिटाला जर्मनीचे आक्रमण फ्रान्सने परतवून लावले.


सहाव्या मिनिटाला फ्रान्सच्या बचाव फळीतील पॅट्रिक इवरा याने मुलेरला अडविले. 31 व्या मिनिटाला जर्मनीला पहिला कॉर्नर मिळाला. 34 व्या मिनिटाला फ्रान्सच्या ग्रिझमान याने सुरेख पास दिला होता. वालबुएना याने डावीकडून गोल मारण्याचा प्रयत्न केला. परंतु जर्मनीच्या
नेूर याने गोल वाचविला. बेन्झेमा याने पुन्हा फटका मात गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र जर्मनीच्या बचाव फळीने हा प्रयत्नही फोल
ठरविला. 44 व मिनिटाला बेन्झेमाला बरोबरीची संधी मिळाली परंतु नेूर याने योग्य पध्दतीने चेंडू अडवित बचाव केला.


गेल दोन स्पर्धामध्ये जर्मनीने उपान्त्य फेरी गाठलेली आहे. आता विश्वचषकाचे जेतेपद मिळविण्यासाठी जर्मनी हा कट्टर दावेदार मानण्यात येत आहे. गेल्या सोळा सामन्यात जर्मनीने एकही सामना गमावलेला नाही. जर्मनीचे अनेक खेळाडू बेअर्न मुनिच क्लबचे प्रतिनिधित्व करतात.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाची लागण

गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाची लागण
गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त येत आहे. दाऊदबरोबरच त्याच्या ...

भयंकर, दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकले

भयंकर, दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकले
मुंबईतील मीरारोडमधील एका बारमध्ये दुहेरी हत्याकांड घडले आहे. एका बारमध्ये दोन ...

पॅकेज नाही तर नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटींच्या मदतीची घोषणा

पॅकेज नाही तर नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटींच्या मदतीची घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळाचा फटका बसलेल्या रायगडमधील नुकसानग्रस्तांसाठी ...

बाप्परे, कोरोनाची चाचणी करून बनावट रिपोर्ट दिले

बाप्परे, कोरोनाची चाचणी करून बनावट रिपोर्ट दिले
मुंबईत ६५ वर्षीय कॅन्सरग्रस्त रुग्णाची कोरोनाची चाचणी करून बनावट रिपोर्ट दिल्याची घटना ...

रिलायन्स जिओने इलेक्ट्रॉनिक्सपासून ते कपड्यांपर्यंत, आकर्षक ...

रिलायन्स जिओने इलेक्ट्रॉनिक्सपासून ते कपड्यांपर्यंत, आकर्षक सवलतीत 4X लाभ सादर केला
यावेळी रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक अतिशय खास आणि आकर्षक ऑफर ...