गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 19 एप्रिल 2022 (09:49 IST)

Cristiano Ronaldo Son Died: क्रिस्टियानो रोनाल्डोच्या मुलाचा मृत्यू

Cristiano Ronaldo Son Died: Death of Cristiano Ronaldo's son Cristiano Ronaldo Son Died: क्रिस्टियानो रोनाल्डोच्या मुलाचा मृत्यू
सर्वाधिक गोल करणारा महान फुटबॉलपटू पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या मुलाचा प्रसूतीवेळी गर्भातच मृत्यू झाला आहे. इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) क्लब मँचेस्टर युनायटेडचा फॉरवर्ड रोनाल्डोने सोशल मीडियावर ही माहिती दिली. रोनाल्डो आणि त्याची जोडीदार जॉर्जिना यांनी गेल्या वर्षी जाहीर केले होते की त्यांना जुळे अपत्य होणार आहे. या दोन मुलांच्या प्रसूतीवेळी मुलाचा गर्भातच मृत्यू झाला तर मुलगी अद्याप सुखरूप आहे. 
 
रोनाल्डोने इंस्टाग्रामवर लिहिले की, 'आमच्या मुलाचे निधन झाल्याचे अत्यंत दुःखाने कळवावे लागते. कोणत्याही पालकांसाठी हे सर्वात मोठे दु:ख आहे. फक्त आपल्या मुलीचा जन्म आपल्याला हा क्षण काही आशा आणि आनंदाने जगण्याची शक्ती देतो. मी सर्व डॉक्टर आणि परिचारिकांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी खूप काळजी घेतली. आम्हाला या बातमीने खूप दुःख झाले आहे आणि लोकांना या कठीण काळात आमची गोपनीयता राखण्याचे आवाहन करतो. आम्ही तुझ्यावर कायम प्रेम करू.' 
 
रोनाल्डोचा राष्ट्रीय फुटबॉल संघ पोर्तुगाल नुकताच युरोपियन पात्रता प्लेऑफमध्ये नॉर्थ मॅसेडोनियाचा 2-0 असा पराभव करून फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरला. रोनाल्डोचा हा पाचवा फिफा विश्वचषक असेल. दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डो सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम रोनाल्डोच्या नावावर आहे. त्याने 800 हून अधिक गोल केले आहेत.