सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. ख्रिश्चन
  4. »
  5. ख्रिश्चन धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

संत थॉमस

येशूपासून प्रेरणा घेऊन धर्मप्रसारासाठी अनेक लोक बाहेर पडले. सर्वांत दूर जाऊन धर्मप्रसार करणार्‍यांत होते संत थॉमस. पॅलेस्टिन व परिसरात धर्माचा प्रचार केल्यानंतर ते भारतात आले.

उतर भारतातील गोंडोफारिस या राजाच्या राज्यात ते होते. तेथे काही काळ त्यांनी धर्मप्रसार केला. नंतर ते दक्षिणेत राजा महादेवच्या राज्यात गेले. इसवी सन 52 मध्ये ते मलाबार प्रांतात (सध्याचे केरळ) गेले.

तेथे त्यांनी ख्रिश्चन धर्माचा मोठा प्रसार केला. तेव्हा ख्रिश्चन बनलेल्यांचे वंशज आजही तेथे आहेत. या भागात थॉमस यांनी ख्रिस्ती मठ, चर्च स्थापन केले. कारोमंडलच्या किनारी भागातही त्यांनी प्रचार सुरू केला होता.

मात्र, त्यांचे कार्य तत्कालिन पुरोहित वर्गाला आवडले नाही. त्यांनी त्यांना विरोध करायला सुरवात केली. राजाकडे तक्रार केली. अखेर थॉमस यांना ठार मारण्यात ते यशस्वी ठरले.

ही घटना आहे इसवी सन ७२ ची. ज्या ठिकाणी थॉमस यांचा मृत्यू झाला तो डोंगर आजही संत थॉमस यांच्या नावाने ओळखला जातो.