testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

संत बार्थोलोमी

वेबदुनिया|
काही इतिहासकारांच्या मते संत बार्थोलोमी हे सुद्धा येशू ख्रिस्ताच्या विचारांच्या प्रचारासाठी भारतात आले होते. तत्कालीन कोकणात प्रसिद्ध शहर असलेल्या कल्याण येथील एका मंदिरात राहू लागले. मग त्यांनी धर्मप्रचाराला सुरवात केली.

लोकांवर त्यांचा प्रभाव पडू लागला. ही बातमी तेथील राजा पुलोमावी याच्याही कानावर जाऊन पोहोचली. मग त्याने बार्थोलोमी यांना बोलवणे पाठवले. त्यांचा प्रभाव पडून राजा पुलोमावीनेही ख्रिश्चन धर्म स्वीकारला.

पण राजाचा भाऊ अरिष्टकर्म याला ही बाब आवडली नाही. त्याने पुलोमावीला राजगादीवरून खाली खेचून स्वतः राजा झाला. नंतर त्याने बार्थोलोमीला मारून समुद्रात फेकून दिले. मात्र, असे झाले तरीही बार्थोलोमीच्या स्मृती आजही कायम आहेत.


यावर अधिक वाचा :