testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

गुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा

जगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार! प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या प्रेषिताला खरेतर आज क्रुसावर चढविले होते. एवढेच काय ज्या
रोमन शिपायांनी त्याला क्रुसावर चढविले होते, त्यांच्यापैकी एकाने स्वत: त्याच्या
छातीत भाला भोसकून तो नक्की मृत झाला आहे ना, याची खात्रीही केली होती. (योहान अध्याय 19 वचन 24) तरी या दिवसाला जगभरात ख्रिस्ती लोक शुभ शुक्रवार- गुड फ्रायडे म्हणतात! का बरे.
कारण हा दिवस इतिहासातील येशू ख्रिस्ताच्या जीवनातील सत्कथेच्या परमोच्च बिंदूकडे घेऊन जातो.
या दिवशी येशू ख्रिस्तापूर्वी होऊन गेलेल्या अनेक संदेष्टय़ांनी वर्तवलेली येशूविषयीची सर्वात महत्त्वाची भविष्यणी पूर्ण झाली होती. कोणतीही चूक, कोणतेही पाप न केलेल्या परमेश्वराच्या पुत्राला माणसांनी सुळावर चढविले. मग हा शुक्रवार शुभ कसा? त्याचे उत्तर बायबलच्या नव करारातील चार शुभवर्तमानात आहे.


येशूंच 12 शिष्यांपैकी फक्त, मार्क, लुक आणि योहान यांनी येशूंच्या मृत्यूनंतर व पुनरुत्थानानंतर अनेक वर्षानी त्याचे चरित्र लिहून ठेवले आहे. त्यानुसार मृत्यूच्या तिसर्या दिवशी जेव्हा त्याचे

शिष्य त्याच्या मृतदेहाला सुगंधी मसाले लावण्यासाठी त्याच्या कबरीजवळ गेले तेव्हा त्यांना
तेथे केवळ त्याची त्यागाची वस्त्रे आढळली. तेव्हा उभ्या असलेल्या एका दिव्य आकृतीने (देवदूत) त्यांना विचारले, तुम्ही येशूला शोधीत आहात का? तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यात का करता? तो तुमच्या आधीच गालील गावामध्ये त्याने मृत्यूपूर्वी सांगितल्यानुसार गेलेला आहे. (बायबल: लुक 24 वा अध्याय वचन 5 व 6) येशूने मृत्यूला शांतपणे सामोर जाऊन, मृत्यूवर विजय मिळवून तो पुनरुत्थानित झाला म्हणून शुक्रवारच्या या दिवसाला शुभ शुक्रवार म्हटले जाते.


अनेकांचा येशूच्या या पुनरुत्थावर विश्वास बसत नाही. परंतु येशू ख्रिस्ताने पुनरुत्थानानंतर त्यांच्या 12 शिष्यांसह सुमारे 500 चे पेक्षा अधिक लोकांना दर्शन दिले. हिंदू धर्माचे महान प्रसारक योगी परमहंस योगानंद यांनीही या गोष्टीची साक्ष दिली आहे. त्यांच्या ‘ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी’ या पुस्तकाला डॉ. डब्लू. वा. इव्र्हेन्स वेन्टस् यांची प्रस्तावना आहे. स्वामींनी या ग्रंथाच मराठी आवृत्तीतील प्रश्न क्र. 678 व 679 या पृष्ठावर स्वत:ला झालेल्या प्रभू येशूंच दर्शनाचा वृत्तांत दिला आहे.


येशू ख्रिस्तांच 12 शिष्यांपैकी एक असलेला संत थॉमस याने येशू ख्रिस्ताच पुनरुत्थानाविषयी संशय
घेतल्याचा उल्लेख बायबलमध्ये आढळतो. पुनरुत्थानानंतर येशू त्यंच्या शिष्यांना भेटला, त्यावेळी त्या खोलीत थॉमस नव्हता, तर इतर शिष्यांनी त्यला येशूच्या दर्शनाचे वृत्त सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ‘मी त्याला प्रत्क्षय पाहिले तरच मी त्यांच्या जिवंत होण्यावर विश्वास ठेवीन.’ त्यानंतर एकदा थॉमससह सर्व शिष्य एका खोलीत प्रार्थना करीत होते व ती खोली आतून बंद होती. त्यावेळी प्रभू येशू तेथे अचानक प्रकटला. त्याच्या भोवतीचा प्रकाश व त्याचे तेज पाहून शिष्य घाबरले. प्रभू त्यांना म्हणाला, ‘तुम्हास शांती असो’ प्रभू येशू ख्रिस्ताने थॉमस या शिष्यला
जवळ बोलावले आणि आपल्या छातीमध्ये ज्याठिकाणी रोमन शिपायाने भाला भोसकला होता, तेथे त्याचे बोट लावले व विचारले. आतातरी विश्वास ठेवतोस का? त्यावर सद्गदीत होऊन थॉमस म्हणाला, माझा प्रभू, माझा देव. माणसाच संशयी प्रवृत्तीला ओळखून येशूने थॉमस या आपल्या
शिष्यला म्हटले, आता तू पाहिले म्हणून विश्वास ठेवला आहे. परंतु जे न पाहता विश्वास ठेवतात ते धन्य.


येशूंचे मृतामधून पुन्हा उठणे व अनेकांना दर्शन देणे हे त्याचे देवत्व व अमरत्व सिद्ध करते. पण त्याही पलीकडे हे सत्य हा शुक्रवार स्पष्ट करतो ते म्हणजे सत्याचा असत्यावरील विजय, प्रेमाचा द्वेषावरील विजय. कारण क्रुसखांबावर आपल्या अंतिम घटिका मोजत असताना या दिव्य
महात्म्याने
‘हे देवा, यांना क्षमा कर कारण ते काय करतात त्यांना कळत नाही’ (लुक अध्याय 23 वचन 34) असे म्हटले होते.


आज सुसंस्कृत जगाला दहशतवादाच्या माध्यमातून वेठीस धरले जात आहे, अशावेळी आपल्या
मारेकण्यांनाच क्षमा करावी, म्हणून परमेश्वराकडे याचना करणारा येशू केवळ आकाशापर्यंतच उंच होत नाही तर स्वर्गापर्यंत उंच होत आहे.


येशूने त्याचे संपूर्ण जीवन मानवाला जीवनाचे खरे ध्येय समजावून सांगण्यात घालविले. ज्या
इस्त्राईलात जेरुसलेम येथे येशूंचा जन्म झाला तेथील धर्मग्रंथात न्याय आणि शिक्षेबद्दल असे सांगितले होते की, कुणी कोणाचा डोळा फोडता तर त्याचा डोळा फोडण्यात यावा. कुणी कोणाचा हात तोडला असेल तर त्याचा हात तोडण्यात यावा. परंतु येशू ख्रिस्ताने मात्र आपल्या अनुयायास
सांगितले, दुष्टाला अडवू नका, जो तुमच्या उजव्या गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसरा गाल करा. जो तुमची बंडी हिसकावून घेऊ पाहतो, त्याला तुझा अंगरखाही दे, याप्रमाणे येशू ख्रिस्ताला सूडचक्रातून मानवजातीची सुटका करायची आहे. कारण रागाने राग आणि द्वेषाने द्वेष वाढतो हाच इतिहास आहे. येशू म्हटले तुम्ही शत्रूवर प्रेम करा, शेजार्‍यावर प्रीती करा, हा जगावेगळा सल्ला कुणालाही पाळायला कठीणच आहे, परंतु प्रभूने यामागे दिव्य तर्कसंगती सांगितली आहे. तो म्हणतो, ‘जे तुम्हाला उसने देतात, त्यांना तुम्ही परत मिळेल या भावनेने उसने दिले तर त्यात काय मोठेपणा? पापी लोक हे पापी लोकांना उसने देतात, तुम्ही पाप पुण्याचा विचार न करता सर्वांवर सारखे प्रेम करणार्‍या परमेश्वराचे पुत्र आहात ना? मग त्याच्यासारखे व्हा.’ तो म्हणजे परमेश्वर चांगल व वाईट अशा दोन्ही लोकांच्या शेतावर पाऊस पाडतो व त्यांना विपुल सुख देऊ इच्छितो. जे तुमचा द्वेष करतात त्यांच्यावर प्रेम केले तरच ते दिव्य प्रेम, नाही तर आपल्यावर
प्रेम करणार्‍यांवर प्रेम करणे हा तर व्यवहार झाला.


आज संपूर्ण जगामध्ये दु:खी लोकांचे अश्रू पुसणार्‍या आजार्‍यांची सेवा करणार्‍या मृत्यूच्या
दारात उभ्या असलेल्यांना, युद्धातील जखमींना, भूकेलेलंना अन्न देणार्‍या, गरिबांची सेवा करणार्‍या असंख्य संस्था, व्यक्ती जे अफाट प्रयत्न करीत आहेत, त्यामागे उभे आहे त्या दिव्य येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी केलेले क्रुसावरचे समर्पण. त्या महान, करुणामयी, प्रेममयी
देवपुत्रास शतश: नमन!


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

Sankashti Chaturthi Vrat गणपतीची कृपा मिळवण्यासाठी केवळ एक ...

national news
संकष्टी चतुर्थी आणि बुधावर हा संयोग जुळून आला आहे. अशात ही संधी साधण्यासाठी आज आम्ही ...

मोठा मंगळवार, का खास आहे आजचा दिवस, काय उपाय करावे

national news
आज मंगळवार असून हा दिवस अत्यंत खास आहे. कारण आज हनुमानाकडून प्रार्थना करून मागितलेली ...

या 4 गोष्टी अमलात आणा, धन वाचेल आणि वाढेल

national news
धन कमावणे, धन प्राप्ती होणे हे सुरळीत असले तरी धन वृद्धी आणि बचतसाठी काही उपाय करणे ...

प्रदक्षिणा घालण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का?

national news
* दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. * प्रदक्षिणा ...

निर्वाण म्हणजे काय?

national news
बौद्ध धर्मात निर्वाण या शब्दाचा अर्थ आहे विझून जाणे. तृष्णेचे विझून जाणे. वासनांचे शांत ...

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...