सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Updated : सोमवार, 21 डिसेंबर 2020 (08:52 IST)

अंक ज्योतिष : मूलांक 2 भविष्यफळ 2021

मूलांक 2 आणि अंक शास्त्र भविष्य वर्ष 2021
मूलांक 2
ज्यांचा जन्म 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक 2 असतो. या अंकाचा स्वामी चंद्र ग्रह आहे. जे सर्वात सौम्य आणि संवेदनशील ग्रह आहे. अशी व्यक्ती भावुक आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाची असते. या लोकांची काल्पनिक शक्ती चांगली असते. असे लोक लोकांचे बोलणे मनाला लावून घेतात. ह्यांच्या कडे कोणतेही काम नसल्यावर हे बऱ्याच वेळा नकारात्मकतेला बळी पडतात. एकाकीपणा जाणवतो. या लोकांना सर्वांच्या बरोबर राहायला आवडतं. तसेच सर्वांच्यासह काम करणे आवडते. वर्ष 2021 मूलांक 2 च्या लोकांसाठी आयुष्यातील नवे धडे शिकवणारे आहे की कसं आयुष्याला एकटे आणि नकारात्मक जगण्यापेक्षा सगळ्यांसह आनंदी होऊन जगावं. या 2  मूलांकाच्या लोकांसाठी या वर्षाचे 5 मूलांक मनाचे घटक चंद्रमा आणि बुद्धीचे घटक बुध एकत्र येत असल्याने मन आणि बुद्धी चे मिलन होतील.
 
करिअर साठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
हे वर्ष या मूलांकाच्या लोकांसाठी कार्यक्षेत्रात नवीन काही घेऊन आले आहे. त्यामुळे या वर्षात नवीन संधीसह बरेच काही शिकायला मिळेल. नवीन व्यवसाय करणाऱ्यांना हे वर्ष यशाचे आहे. लाभ होतील. या वर्षात आपण आपल्या कामात आनंदी व्हाल. कामानिमित्त प्रवास घडतील. नोकरदार वर्गासाठी हे वर्ष नोकरीत मनाप्रमाणे संधी घेऊन येणारे आहे. मे महिन्यापूर्वी पदोन्नती च्या चांगल्या संधी मिळतील. जी लोक एखाद्या नव्या नोकरीच्या शोधात आहे तर त्यांना एप्रिल पर्यंत नवी नोकरी मिळेल आपल्या बळावर काही नवीन करून दाखविण्याची संधी मिळेल. ऑगस्टनंतर मनात काही संघर्षात्मक स्थिती बनेल. या काळात रागाच्या भरात येऊन नोकरी सोडू नका.
 
आर्थिक दृष्ट्या कसे असणार हे वर्ष 2021 : 
या मूलांकाच्या लोकांसाठी या वर्षात धनागमनाची स्थिती चांगली राहील. खर्चांवर आळा घाला. कारण आपण या वर्षात पैशांचा बाबतीत स्वच्छंद असाल आणि बचतीकडे आपलं लक्षच नसेल. वर्षाची सुरुवात घर खरेदी करण्यासाठी चांगली असेल आणि आपण घराच्या सुसज्जे वर पैसे खर्च कराल. मे ते सप्टेंबरचा मध्य काळ आपण एखाद्या जागेसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करू नये. तसेच शेअर बाजारात देखील गुंतवणूक करू नये. वर्षाच्या शेवटी पगारात बढती झाल्यानं फायदे मिळतील आणि आपण आपले उर्वरित कामे पूर्ण करू शकाल. कर्ज घेण्याचा विचार करीत असाल तर वर्षाच्या मध्यकाळ वगळून इतर काळ उत्तम राहील. 
 
प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनासाठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
मूलांक 2 म्हणजे चंद्रमाच्या प्रभावा खाली असणाऱ्या या लोकांसाठी वर्ष 2021 बुधाचे आहे. आपणांस कुटुंबासमवेत चालणे आवडते. पण या वर्षात काही बदल घडतील. या वर्षी आपण आपल्या जोडीदारासह रोमँटिक वेळ घालवाल. जवळीक होईल त्यामुळे आपलं नातं लग्नात बदलेल. आपण एकटे आहात आणि एखाद्या जोडीदाराच्या शोधात आहात तर वर्षाच्या सुरुवातीला आपली मैत्री होईल जी प्रेमाच्या नात्यात बदलेल. विवाहित लोकांच्या आयुष्यात देखील परस्पर प्रेम वाढेल. आपण दोघे एकमेकांसमवेत बोलण्यात, बाहेर जाण्यात वेळ घालवाल. जुलै नंतर नात्यात तणाव आणि मतभेदाची स्थिती उद्भवेल आणि नात्यात दुरावा येऊ शकतो. नात्यात गैर समज होऊ देऊ नका आणि वेळीच नात्याला जपा. वर्षाच्या शेवटी नात्यात गोडवा निर्माण होण्यास सुरुवात होईल.
 
आरोग्यासाठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
हे वर्ष या मूलांकासाठी मिश्रित फळ घेऊन आले आहे. खाण्या-पिण्याचे पथ्य सांभाळावे लागतील. सकाळी लवकर उठून योग आणि ध्यान साठी वेळ द्यावे लागेल. जर वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला सर्दी-पडसं किंवा कफाचा त्रास होत असल्यास या काळात काळजी घ्या. कामाच्या अधिक ताणामुळे तणाव राहील. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होईल. आपण स्वतःला एकटे समजू नका आणि सर्वांच्या समवेत वेळ घालविण्याचा प्रयत्न करा, जेणे करून मानसिक ताण कमी होईल. वर्षाच्या शेवटी पोट आणि त्वचेशी निगडित काही त्रासांसाठी खबरदारी घ्या.