शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2024
Written By
Last Modified: रविवार, 14 जानेवारी 2024 (09:11 IST)

Weekly astro साप्ताहिक राशीफल 15 जानेवारी ते 21 जानेवारी 2024

weekly rashifal
मेष : आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. आपणास या वेळी काही प्रेमपूर्ण अनुभव येऊ शकतात व हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. आपल्या सर्जनशील व कलात्मक विशेषतेंना देखील प्रेरणा आली आहे. इतर लोकांना आपल्या स्वतःच्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांबरोबर किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या वेळी आपल्यासाठी फळदायी आहे. 
 
वृषभ : पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल. जर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.
 
मिथुन : वेळ अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायासाठी वेळ अनुकूल ठरेल. कुटुंब आनंदाचे कारण बनेल. स्वतःला इतर लोकांसामोर सादर करण्याचे सामर्थ्य आणि इतर लोकांसाठी आपले विचार अत्यंत चांगले आहेत. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले सहकार्य आपली उत्तम राजकीय जाण दाखवते. नोकरी व्यवसायात आपले तत्व सोडून कोणतेही काम करु नका. नवीन करार करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करणे तूर्त टाळावे. दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. 
 
कर्क : इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील. एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील. लेखक, साहित्यीक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. आपली सामाजिक, राजकीय प्रतिष्ठा उंचावेल. व्यवसाय उद्योगातील उधारी उसनवारी वसूल होईल. आपल्या वाक्चातुर्य़ाने दुसर्‍यांची मने जिंकून ध्येयपूर्ती कराल. 
 
सिंह : वरिष्ठ लोकांचा महत्वपूर्ण कामात सहकार्य मिळेल. आपले अधिकारी देखील आपणास सहयोग देतील. आपले विरोधक पराभूत होतील. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा. स्थिती अनुकूल राहील. महत्वाच्या कार्यात यश मिळेल. पूर्वी भावंडांशी झालेले मतभेद आपण गोड बोलून नाहिसे कराल. आपले अंदाज अचूक ठरतील. सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद लुटाल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. गुंतवणूकीतून लाभ होतील. जूनी व्यावसायिक येणी वसूल होतील. आपल्या मतांचा आदर केला जाईल.
 
कन्या : वेळेकडे लक्ष्य ठेवा. कार्यास अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. कार्यक्षेत्रात मानसिक ताण होण्याची शक्यता आहे. आनंदाचे वातावरण असल्यामुळे कार्य सुरळीत होतील. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. मित्रांचा पाठिंबा राहील. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा.
 
तूळ : प्रवासाचा एक चांगला योग संभवतो परंतु त्यासाठी आपणास फार मोठी किंमत द्यावी लागू शकते. या प्रवासाच्या खर्चात काटकसर करण्याचे मार्ग शोधा. अनुभवी लोकांची मदत घ्या. आपल्या वेळेचा योग्य उपयोग करा. आपल्या महत्वाकांक्षापूर्ण होतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. व्यापार-व्यवसायात काळ अनुकूल आहे. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. नोकरीत पदोन्नती होईल. संतांचा सहवास लाभेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील. धाडसी निर्णय घेतले जातील.  
 
वृश्चिक : योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी आपणास त्या कामला मुहूर्तमेढ देण्यात येऊ शकतात ज्या बर्‍याच दिवसांपासून आपल्या डोक्यात आहे. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर विसंबून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. नोकरीपेशा व्यक्ती काळजीपूर्वक कार्ये करा.  कुटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी वाटेल. घरातील दुर्लक्षित कामांना वेळ देता येईल. प्रतिस्पध्र्याची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या अनिश्‍चितता जाणवेल. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल.
 
धनु : मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंद प्राप्ति होईल. वाहनसुख मिळेल. कार्याचा ताण आणि नवीन जबाबदार्‍या आपल्यासाठी ताण आणि काळजीचे कारण बनू शकतात. थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा.  प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. आत्मविश्‍वास व मनोबल उत्तम राहील. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोकेवर काढतील. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. आपले आवडते छंद पासण्यासाठी वेळ देता येईल.
 
मकर : आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आज आपणास नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आपण त्यांचा योग्यरीत्या वापर केल्याने आपणास चांगले यश मिळू शकते. आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.  व्यवसायत उद्योगातून चांगली प्राप्ती होईल. व्यवसाय उद्योगात अभिनवपूरक तंत्र वापरले तर चांगली भरभराट होईल.जोडीदाराची पदोन्नती होईल. जनसंपर्कातून लाभ होतील. नवोदित कलाकारांना प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे योग येतील.  
 
कुंभ : आपला स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा कटु शब्दांचा उपयोग आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात. मानसिक स्थिती आल्हाददायक राहील व वरिष्ठांबरोबर संपर्कात आल्याने प्रसन्नताचे वातावरण राहील. नवीन संधी मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. व्यस्तता जास्त राहील. कौटुंबिक विषयांमध्ये धनाचे व्यय होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती मिश्रित राहील.  उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल. 
 
मीन : मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. शत्रू पराभूत होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. मोठय़ा व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणार्‍या घटना घडतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. कामाची आखणी नियोजनबद्ध केल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष साधता येईल. आपले काम दुसर्‍यावर सोपवू नका. .