शतकानुशतके पाहिले गेलेले अपूर्ण स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे

Lata Mangeshkar
Last Modified बुधवार, 5 ऑगस्ट 2020 (15:54 IST)
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळ्यासंदर्भात बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनीही ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. लता मंगेशकर यांनी ट्वीट करून लिहिले की, शतकानुशतके पाहिले गेलेले अपूर्ण स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे. लता दीदी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, अयोध्येत भगवान श्री रामाच्या मंदिर बांधकाम कार्य सुरू आहे, ज्याबद्दल मला खूप आनंद आहे.

लता मंगेशकर यांनी या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “अनेक राजे, अनेक पिढ्यांचे आणि संपूर्ण जगाच्या रामभक्तांचे शतकानुशतके अपूर्ण राहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. अनेक वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत भगवान श्री राम यांचे मंदिर पुन्हा उभारले जात आहे, शिलान्यास होत आहे. आदरणीय लालकृष्ण आडवाणी जी यांना मोठे श्रेय जाते, कारण त्यांनी या विषयावर रथयात्रा घेऊन भारतभर सार्वजनिक प्रबोधन केले होते. तसेच त्याचे श्रेय आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनाही जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व मान्यवर लोकांच्या उपस्थितीत होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त करताना लता मंगेशकर यांनी लिहिले की, “आज या शिलान्यासची एक मोठी घटना घडत आहे ज्यामध्ये आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत जी, उत्तर प्रदेशचे राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी आणि रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ जी आणि अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित असणार आहेत.
कोरोनामुळे लाखो भाविक तेथे पोहोचू शकणार नाहीत, परंतु त्यांचे मन आणि लक्ष श्री रामांच्या चरणी नक्कीच असणार आहे. आदरणीय नरेंद्रभाईंच्या हस्ते हा आयोजित सोहळा पार पडणार आहे, याचा मला आनंद आहे. आज मी, माझे कुटुंब आणि संपूर्ण जग खूप आनंदी आहे आणि जणू हृदयाचा प्रत्येक ठोका, प्रत्येक श्वास जय श्री राम म्हणत आहे., असे ही त्यांनी आपल्या ट्विटमधून लिहीत लता दीदी व्यक्त झाल्या आहेत.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

'आईसारखी असेल मुलगी', आंतरराष्ट्रीय महिला दिनी विराट ...

'आईसारखी असेल मुलगी', आंतरराष्ट्रीय महिला दिनी विराट कोहलीचा संदेश मन जिंकेल
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोमवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पत्नी ...

Women’s Day अमृता फडणवीसांचा खास संदेश

Women’s Day अमृता फडणवीसांचा खास संदेश
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ...

मराठा आरक्षण : पुढील सुनावणी १५ मार्च रोजी

मराठा आरक्षण : पुढील सुनावणी १५ मार्च रोजी
मराठा आरक्षणासंदर्भातली पुढची सुनावणी १५ मार्च रोजी होणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ...

मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा? राज ...

मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा? राज ठाकरेंचा सवाल
मुंबई- आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा होत आहे. या दिनाच्या निमित्ताने मनसेचे अध्यक्ष ...

Apple आपला लोकप्रिय iMac Pro कॉम्प्युटर बंद करीत आहे, फक्त ...

Apple आपला लोकप्रिय iMac Pro कॉम्प्युटर बंद करीत आहे, फक्त शेवटची काही युनिट्स शिल्लक आहेत
Apple आपला लोकप्रिय iMac Pro कॉम्प्युटर बंद करीत आहे, फक्त शेवटची काही युनिट्स शिल्लक ...