शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (17:57 IST)

शरद पवार : 'धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे

"धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे असून त्यावर पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी फेसबुकद्वारे त्यावर स्पष्टीकरणही दिलं आहे.
धनंजय मुंडे यांच्या आरोपां संदर्भात पक्ष काय भूमिका घेणार, अशी चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची आज (14 जानेवारी) बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
धनंजय मुंडेंवर पक्ष कारवाई करणार का?
 
धनंजय मुंडे यांनी बुधवारी (13 जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आपले स्पष्टीकरण दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
 
पवार यांनी म्हटलं, "धनंजय मुंडे यांनी मला भेटून सविस्तर माहिती दिली. पक्षाच्या प्रमुख नेत्यांसमोर हा विषय मांडणार आहे. त्यांचे काही व्यक्तिगत संबंध होते त्यातून पोलीस तक्रार झाली आहे. धनंजय मुंडे यांनीही यापूर्वी न्यायालयात दाद मागितली आणि आदेश मिळवला."

"पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना त्यांनी दिलेली माहिती देणं माझे कर्तव्य आहे. त्यांची मतं जाणून घेऊन पुढची पावलं उचलण्यासंदर्भात निर्णय घेणार आहोत." असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी याबद्दल बोलताना म्हटलं आहे की, मी शरद पवार यांना सविस्तर माहिती दिली आहे,