1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : बुधवार, 29 मे 2019 (15:21 IST)

अरुण जेटली यांनी घेतली माघार, नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात नसणार

अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहून यंदाच्या मंत्रिमंडळात त्यांना समाविष्ट करू नये अशी विनंती केली आहे.
 
नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात अरुण जेटली अर्थमंत्री होते.
 
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या एकदिवस आधी जेटलींनी मोदींना लिहिलेलं पत्र ट्वीट करून त्याबाबतची माहिती दिली आहे. या पत्रात त्यांनी त्यांच्या आरोग्याचा संदर्भ दिला आहे.
जेटली यांनी या पत्रात लिहिलं आहे, "गेल्या 8 महिन्यांपासून मी गंभीर आरोग्य समस्यांशी लढा देत आहे. डॉक्टरांच्या मदतीनं त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुकांचा प्रचार संपल्यानंतर मी तुम्हाला याबाबत तोंडी सांगितलं होतं, यापुढे मला कुठल्याही जबाबदारीपासून दूर ठेवावं अशी विनंती."
 
"आता मी आपल्याला औपचारिक विनंती करत आहे की नव्या सरकारमध्ये न सहभागी होण्याची अनुमती मला द्यावी."
 
अमेरिकेला उपचाराला गेल्यामुळे अरूण जेटली यावर्षी मोदी सरकारचा बजेट सादर करू शकले नव्हते.
1 फेब्रुवारी रोजी त्यांच्या वतीने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी अंतरिम बजेट सादर केला होता.
 
गेल्यावर्षी एप्रिलमध्ये कडनीवर उपचार करण्यासाठी अरुण जेटली यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.
 
जेटली यांनी स्वतः ट्वीट करून त्यांना किडनीच्या समस्येनं ग्रासलं असल्याचं सांगितलं आहे.