सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 14 नोव्हेंबर 2019 (11:30 IST)

विकास आराखड्यानुसार अयोध्या 'अध्यात्मिक नगरी'

सर्वोच्च न्यायालयानं रामजन्मभूमी बाबरी-मशीद जमीन वादावरील निकालात राम मंदिर उभारणीचा मार्ग खुला केल्यानंतर अयोध्येचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे.
 
या आराखड्यानुसार अयोध्येत पंचतारांकित हॉटेल, रिसॉर्ट, आंतरराष्ट्रीय बस टर्मिनल आणि विमानतळ या सुविधा करण्यात येणार आहेत.
 
"अयोध्या तीर्थ विकास परिषदेची स्थापना करण्यात येणार असून अयोध्येचं रुपांतर तिरूपतीसारख्या शहरात करण्यासाठी साधारण 4 वर्षं लागणार आहेत. अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात येणार आहे. अयोध्येतील राम मंदिर देशातील सर्वांत मोठे धार्मिक ठिकाण राहील. 2000 कारागिरांनी रोज 8 तास काम केलं, तर अडीच वर्षांत मंदिराची निर्मिती होऊ शकेल. मंदिराच्या 77 एकर परिसरात अनेक धार्मिक संस्था उभारण्यात येणार आहेत. गोशाळा, धर्मशाळा, वैदिक संस्था यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. अयोध्येचा विकास 'अध्यात्मिक नगरी' म्हणून केला जाणार आहे," असं अयोध्येचे उपमाहिती संचालक मुरलीधर सिंग यांनी सांगितल्याचं बातमीत म्हटलं आहे.