शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019 (14:07 IST)

महाराष्ट्र सत्तासंघर्ष LIVE: भाजप नेते आशिष शेलार यांनी लीलावतीत घेतली संजय राऊतांची भेट

मुंबई आणि दिल्लीत सोमवारी (11 नोव्हेंबर) झालेल्या वेगवान घडामोडीनंतर राज्यपालांनी शिवसेनेचा सरकारस्थापनेचा दावा फेटाळला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र ऐनवेळेपर्यंत मिळालं नाही. त्यातच राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी मुदत वाढवून देण्यास नकार दिल्याने शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली.
 
राज्यपालांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी विचारणा केली असून त्यांना आज (12 नोव्हेंबर) रात्री साडे आठपर्यंतची मुदत दिली आहे. आज (12 नोव्हेंबर) दिवसभर बैठका आणि चर्चांच्या अनेक फेऱ्या घडतील.
 
या सत्तासंघर्षाचे सर्व अपडेट्स इथं वाचा.
 
13.26 : आमचा पक्ष कुणालाही पाठिंबा देणार नाही- ओवैसी
 "भाजप आणि शिवसेना हे दोघं हिंदुत्वाला मानणारे आहेत, त्यांनी विचार केला पाहिजे, महाराष्ट्राला सरकारची गरज आहे. आमचा पक्ष शिवसेना किंवा भाजपचं कुणाचंही सरकार येत असेल तर त्यांना पाठिंबा देणार नाही. आमच्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये कुठलाही फरक नाही. मतांचं विभाजन आता कोण करत आहे हे लोकांना कळेल." असं ते म्हणाले.
 
12.49 : मतभेद असले तरी एकमेकांच्या तब्येतीची चौकशी करणे ही संस्कृती- आशिष शेलार
भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांची लीलावती रुग्णालयात भेट घेतली. ते म्हणाले, "आमचे मित्र' संजय राऊतजी जे सामनाचे मित्र आहेत त्यांच्या तब्येतीचे चौकशी करण्यासाठी आलो होतो. कोणतीही राजकीय चर्चा नाही. किंबहुना त्यांनी कमी बोलावे अशीच आमची अपेक्षा आहे तब्येतीच्या कारणाने."
 
12.34: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल आणि मल्लिकार्जून खरगे मुंबईत येणार
 
12.16 :शरद पवार आणि सोनिया गांधींशी चर्चा झाली. चर्चेमध्ये काय होईल हे सांगता येत नाही. आम्ही दोघं एकत्र मिळून निर्णय घेऊ.- मल्लिकार्जून खरगे